न.प मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, सय्यद सादात दर्गाह समोरील रस्ता खराब झालेला आहे. नवीन नळाची पाईपलाईन झाल्यामुळे हा रस्ता संपूर्ण उखडला आहे. नळाची पाईपलाईन टाकल्यानंतर त्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यावरून येणाऱ्या- जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. हा रस्ता खराब झाल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावर खड्डे असल्यामुळे वयोवृद्ध, लहान मुलाना येण्या - जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता घराच्या चौकटीच्या वर गेला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी, नालीचे घाण पाणी घरांमध्ये शिरत आहे. त्यामुळे या रस्त्याचे खोदकाम करून नवीन सिमेंट रस्ता तयार करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन कार्यालयीन अधीक्षक म. जाकेर यांना देण्यात आले. या निवेदनावर सय्यद तोहिद, राजू कांबळे, आरेफ कादरी, शेख मुजम्मिल, सय्यद वाजीद, शेख आवेस, शेख नसीर, शेख गुलाम, रघुवीर मोडक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
रस्त्याचे खोदकाम करून सिमेंट रस्ता तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:56 IST