शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

वारंगा फाटा येथे धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 23:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवारंगाफाटा : कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा येथील कापड दुकान फोडून रोख रक्कम व मुद्देमाल असा एकूण १ लाख २४ हजार ६८१ रूपयांचा चोरट्यांनी लंपास केला. ११ जुलै मध्यरात्रीच्या सुमारास चोरीची घटना घडली. १२ जुलै रोजी सकाळी ९ वाजता नियमित प्रमाणे दुकान उघडण्यासाठी आलेल्या दुकान मालकास चोरी झाल्याचे समजले. भरवस्तीत ...

लोकमत न्यूज नेटवर्कवारंगाफाटा : कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा येथील कापड दुकान फोडून रोख रक्कम व मुद्देमाल असा एकूण १ लाख २४ हजार ६८१ रूपयांचा चोरट्यांनी लंपास केला. ११ जुलै मध्यरात्रीच्या सुमारास चोरीची घटना घडली. १२ जुलै रोजी सकाळी ९ वाजता नियमित प्रमाणे दुकान उघडण्यासाठी आलेल्या दुकान मालकास चोरी झाल्याचे समजले. भरवस्तीत दुकान असून शिवाय हाकेच्या अंतरावरच पोलीस मदत केंद्र आहे. तरीसुद्धा याठिकाणी धाडसी चोरी झाल्याने एकच चर्चा होत आहे.कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा येथील मदन श्रीराम वायकोळे यांच्या यश ड्रेसेस कापड दुकानाचे मागील बाजूने असलेले बांधकाम चोरट्यांनी फोडले. व आतील लोखंडी दरवाजा तोडून चोरट्यांनी धाडसी चोरी केली. दुकानातील पैसे ठेवण्याच्या पेटीचे कुलूप तोडून १६ हजार ७९० रूपये रोख व दुकानातील जीन्स पँट, शर्ट व इतर कपडे १ लाख ७८ हजार ९१ रूपये असा एकूण १ लाख २४ हजार ६८१ रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. घटनेची माहिती मिळताच आखाडाबाळापूर पोलीस ठाण्याचे पोनि व्ही. एम. केंद्रे, अशोक कांबळे आदींनी भेट देऊन पाहणी केली. फिर्याद देण्यासाठी गेलेल्या दुकानमालकाचा मात्र केवळ लेखी तक्रार अर्ज घेण्यात आला. चोरट्यांवर गुन्हा दाखल करून घेण्याऐवजी अर्जच घेतला आहे. दरम्यान, वारंगा फाटा येथे दुकान, पानटपरी आणि ईतर ठिकाणी चोऱ्यांचे सत्र सुरू आहेच. परंतु अद्याप एकाही चोरीचा तपास पोलिसांना लागला नाही. विशेष म्हणजे काही चोºयांची नोंदच झाली नाही. परंतु आता या धाडसी चोरीची सर्वत्र चर्चा असून चोरट्यांचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हानच आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा