वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:19 AM2021-07-22T04:19:33+5:302021-07-22T04:19:33+5:30

कुरुंदा येथील नेहरूनगर येथील रस्त्यावर सीताराम दाळपुसे यांच्या शेतानजीक कैलास शंकरराव जमरे याने ट्रॅक्टर (एमएच ३८ व्ही ७४०२) वेगात ...

Both died in different accidents | वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

Next

कुरुंदा येथील नेहरूनगर येथील रस्त्यावर सीताराम दाळपुसे यांच्या शेतानजीक कैलास शंकरराव जमरे याने ट्रॅक्टर (एमएच ३८ व्ही ७४०२) वेगात चालवून बद्रीनाथ काशीनाथ जमरे (वय २४) याला पाठीमागून धडक दिली. यामुळे तो नाल्यात जाऊन पडला. यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने बद्रीनाथचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. २०) सायंकाळी ७.३० च्या सुमारास घडली. बद्रीचा शोध घेऊनही तो न सापडल्याने तक्रार देण्यासही विलंब झाला. कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

वसमत तालुक्यातील कौठा चौफुली येथे चालक बाळू खराटे याने मोटारसायकल (एमएच ३६ एन ६६८३) ला दुचाकी क्रमांक एमएच २२ एव्ही ०३१७ ने पाठीमागून धडक दिली. दुचाकीवर बसलेल्या शीतल अनंता खराटे व मुलगा अभंग हे दोघे यात गंभीर जखमी झाले. यात शीतल यांचा मृत्यू झाला. यावरून वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title: Both died in different accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.