शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत विहिरीत आढळला महिलेचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 19:46 IST

खटकाळी भागातील विहीरीवर सोमवारी सकाळी चिखलवाडी भागातील काही नागरीक पाणी भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी पाण्यावर मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले.

हिंगोली : शहराजवळ असलेल्या खटकाळी भागातील एका विहीरीमध्ये सोमवारी ( दि. १५ ) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका २५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. ऐश्‍वर्या महेश श्रीरामे असे मृत महिलेचे नाव आहे. मृत महिलेच्या हातावर कापल्याच्या जखमा आढळून आल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी तपास सुरु केला असून तपासानंतरच आत्महत्या आहे की, खून हे स्पष्ट होणार आहे.

खटकाळी भागातील विहीरीवर सोमवारी सकाळी चिखलवाडी भागातील काही नागरीक पाणी भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी पाण्यावर मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना मिळताच पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बळीराम बंदखडके, जमादार रविकांत हरकाळ, अशोक धामणे, गजानन पोकळे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर नागरीकांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह विहीरीच्या बाहेर काढला. 

मृत महिला महसुल कॉलनी भागात राहणाऱ्या ऐश्‍वर्या महेश श्रीरामे यांचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्या विहीरीत मृतदेह आढळला त्या विहीरीवर रक्ताचे डाग असून विहीरीपासून काही अंतरावरही रक्त सांडलेले आढळून आले आहे. त्यामुळे ही घटना आत्महत्या का खून याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

टॅग्स :Deathमृत्यूWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारी