शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

वसई शिवारात आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 00:53 IST

कळमनुरी/औंढा नागनाथ : औंढा नागनाथ तालुक्यातील वसई शिवारातील झाडाला गळफास घेऊन लटकलेल्या व कुजलेल्या अवस्थेत अज्ञात युवकाचा मृतदेह ८ आॅक्टोबर रोजी ग्रामस्थांना आढळून आल्याची घटना घडली.

कळमनुरी/औंढा नागनाथ : औंढा नागनाथ तालुक्यातील वसई शिवारातील झाडाला गळफास घेऊन लटकलेल्या व कुजलेल्या अवस्थेत अज्ञात युवकाचा मृतदेह ८ आॅक्टोबर रोजी ग्रामस्थांना आढळून आल्याची घटना घडली. याप्रकरणी कळमनुरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ग्यानदेव निवृत्ती साबळे (५५) रा. वसई ता. औंढा नागनाथ असे मृताचे नाव आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला. सदर मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळी शवविच्छेदन करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात केले होते. पोहकॉ राठोड यांच्या फिर्यादीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सदरील घटना खून की आत्महत्या? याचा पोलीस शोध घेत आहेत. तपास पोउनि जामगे करत आहेत.वाहनचालकांवर कारवाई; दंड वसूललोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर पोलिसांनी ७ आॅक्टोबर रोजी कारवाई केली. जिल्हाभरातील विविध पोलीस ठाणे हद्दीत तसेच सार्वजनिक ठिकाणी अवैध वाहतूक वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांविरूद्ध कारवाई करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया २० वाहन चालकांकडून पोलिसांनी ५ हजार ८०० रूपये दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यामधोमध वाहन उभे करणाºया, वर्दीळीच्या रस्त्यावरून वाहने सुसाट पळविणाºयांविरूद्ध पोलिसांनी कारवाई केली.विवाहितेचा संशयास्पद मृत्यूऔंढा नागनाथ : तालुक्यातील भगवा येथील स्वाती सचिन जायभाय (२५) या विवाहित युवतीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. सदर विवाहिता सासरच्या घरी मृत अवस्थेत आढळून आली होती. दोन्ही कुटूंबात वाद सुरु आहे. सदरील युवतीस औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी रुग्णालयात पोलीस हजर होते.

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी