शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादातून भाजप महिला पदाधिकाऱ्यास मारहाण; पिस्तूलाने मुलाचे डोके फोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 15:09 IST

वसमत शहरातील घटना; शेतीच्या जुन्या वादातून घडला प्रकार

वसमत: शेतीच्या जुन्या वादाच्या कारणावरून भाजप महिला पदाधिकाऱ्यास मारहाण करून मुलाच्या डोक्यात पिस्तूलाने मारून डोके फोडले. ही घटना वसमत शहरातील बहिर्जी कॉलेजजवळ २२ मार्च रोजी दुपारी १२:२० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी हैदराबाद येथील एकासह अन्य चार जणांविरूद्ध वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. 

वसमत येथील भाजप महिला पदाधिकारी उज्ज्वला तांभाळे यांचे कुटूंबिय व हैदराबाद येथील मोहम्मद फारूक उल्ला बेग उर्फ माजीदउल्ला बेग सयदउल्ला बेग यांच्यात शेतीचा जुना वाद आहे. येथील बहिर्जी कॉलेज परिसरात मोहम्मद बेग यांच्यासह इतर चार जण आले होते. यावेळी मोहम्मद याने उज्वला तांभाळे यांच्या मुलाच्या डोक्यात पिस्तूल मारून डोके फोडले. तर उज्वला तांभाळे यांच्या हाताच्या पंजास मारहाण करून फॅक्चर केले. तसेच अन्य एका नातेवाईकास रॉड, बेल्टने मारहाण केल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

या प्रकरणी गौरव विजयप्रकाश तांभाळे (रा. वसमत) यांच्या फिर्यादीवरून मोहम्मद फारूकउल्ला बेग उर्फ माजीदउल्ला बेग सय्यदउल्ला बेग याचेसह अन्य चार जणांविरूद्ध वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी संजय हिबारे, पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, सहायक पोलिस निरीक्षक मांजरमकर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.

वसमत पोलिसांनी तिघे जण घेतले ताब्यात ... शहरात मारहाण करुन पसार झालेल्या आरोपीच्या शोधासाठी शहर पोलिसांचे पथक आरोपींच्या मागावर होते सायंकाळी ८ वा दरम्यानात तिन जणास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे,या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. - कुंदनकुमार वाघमारे, पोलिस निरीक्षक 

वसमत घनास्थळी आरोपींनी केला गोळीबार? तांभाळे यांच्या सोबत वाद घालत प्रथम आरोपींनी हावेत गोळीबार केला त्या नंतर पिस्तुलने गौरव तांभाळे यांच्या डोक्यात मारुन डोके फोडले इतरांना रॉडने मारहाण करण्यात आली, आरोपींनी घटनास्थळी गोळीबार केला का याची चौकशी पोलीस करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली