Bite nine of the Mokat monkeys | मोकाट माकडाचा नऊ जणांना चावा
मोकाट माकडाचा नऊ जणांना चावा

लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : तालुक्यात गोजेगाव येथे ९ वाटसरूंना रानटी माकडाने चावा घेऊन जखमी केल्याची घटना शनिवारी घडली. ही घटना सेल्फी घेण्याच्या नादात घडली असल्याची चर्चा आहे. या माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे.
औंढा रस्त्याच्या कडेला गोजेगाव फाटा आहे. या ठिकाणी काही दिवसांपासून एक माकड फिरत आहे. कुणीतरी ट्रक चालकाने ते सोडले असावे त्यामुळे तो माणसांकडे येत आहे. मात्र सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला असता वाडी येथील खुशाल दराडे, प्रभाकर सांगळे, मारोतराव सांगळे, प्रल्हाद सांगळे यांना चावा घेतला आहे. प्रभाकर सांगळे, सोनु जायभाये, प्रल्हाद सांगळे, मारोती सांगळे, रमेश सांगळे यांना बोचकारून जखमी केले आहे. याबाबत वन विभागाला ग्रामस्थांनी कळविले आहे.


Web Title:  Bite nine of the Mokat monkeys
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.