शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी कारवाई; खुदनापुर शिवारात १८ लाखांचा गांजा जप्त, आरोपी पळून जाण्यात यशस्वी

By विजय पाटील | Updated: January 11, 2024 11:38 IST

एलसीबीची कारवाई; वसमत तालुक्यातील घटना

हिंगोली: वसमत तालुक्यातील खुदनापुर शिवारातील शेतात शासनाने प्रतिबंधित केलेल्या गांजाचा साठ्यावर ‘एलसीबी’च्या पथकाने गुरुवारच्या पहाटे छापा टाकला. यावेळी ८९ किलो गांजाचासाठा (किंमत १७ लाख ८३ हजार ९६० रुपये) व  मुद्देमाल जप्त करण्यात आला.  याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसमत तालुक्यात चंदन तस्करी पाठोपाठ गांजाची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. चंदनासाठी ओळखला जाणारा तालुका गांजासाठी ओळखला जात आहे. तालुक्यातील खुदनापूर  शिवारात एका शेतात गांजाचासाठा असल्याची माहिती ‘एलसीबी’च्या पथकास मिळताच पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एलसीबी’ चे पोलिस निरीक्षक पाटील, सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, आकाश टापरे, स. बाबर यांच्यासह एलसीबीच्या पथकाने गुरुवारी पहाटे ३ वाजेदरम्यान आदिनाथ नागोराव चव्हाण यांच्या शेतात छापा टाकला. यावेळी आसता शेतातील विहिरीजवळ ४० पिवळे पॉकीट ज्यात ८९ किलो १९८ ग्रॅम गांजा आढळला. पोलिसांनी तो छापा टाकताच जप्त केला. 

चाहूल लागताच आरोपी गेला पळून...पोलिस येत असल्याची चाहूल आरोपीस लागताच अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार झाला. याप्रकरणी सकाळी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या फिर्यादीवरून आदिनाथ चव्हाण याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम हे करीत आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थ