उंडेगाव येथील बौद्ध मागासवर्गीय वस्तीमध्ये वीज रोहित्राअभावी ग्रामस्थांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या भागात वीज रोहित्र उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी वारंवार करण्यात आली. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने आपल्या विविध मागण्यांसाठी भीमशक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारी येथील वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर उंडेगाव येथील बौद्ध मागासवर्गीय वस्तीमध्ये वीज रोहित्र तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावे, या रोहित्राच्या मंजुरीला फेटाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच जवळा बाजार येथील सहायक अभियंत्याची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, या मागण्यांसाठी श्राद्ध घालो आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा यावेळी इशाराही देण्यात आला.
यावेळी भीमशक्तीचे मराठवाडा उपाध्यक्ष मिलिंद मोरे, माजी नगरसेवक मिलिंद उबाळे, युवा जिल्हाध्यक्ष विशाल इंगोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमित कळासरे, औंढा तालुकाध्यक्ष प्रमोद कुलदीपके, सतीश भिसे, आशाताई कीर्तने, सिद्धार्थ भारशंकर, सागर दीपके, प्रवीण कुलदीपके, जमुनाबाई पाडवीर, लता इंगोले, विद्या इंगोले, संघरत्न इंगोले, गौतम इंगोले, लक्ष्मण रणवीर, गौतम भारशंकर, वंदना इंगोले, मुकेश चव्हाण, भीमा कांबळे, राहुल वाळवंटे, सुशिला भारशंकर, संगीता गायकवाड, दीक्षाबाई मुळे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.
फाेटाे नं. १३