शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बीडप्रमाणेच आता कुरुंद्यातील टोकाईगडावर होणार वृक्षसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 20:04 IST

सिनेअभिनेता सयाजी शिंदे यांनीच ही घोषणा केली असल्याने परिसरातील वृक्षप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

ठळक मुद्देकुरूंद्यातील टोकाई गडावर वनराई फुलवण्यासाठी वृक्षप्रेमी गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्नशील होते.जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. 

कुरूंदा (जि.हिंगोली) : बीड जिल्ह्यातील पालवननंतर आता कुरुंदा येथील टोकाईगड लवकरच हिरवाईने नटलेला दिसणार आहे.  सिनेअभिनेता सयाजी शिंदे यांनीच ही घोषणा केली असल्याने परिसरातील वृक्षप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गड हिरवाईने नटल्यानंतर याच ठिकाणी वृक्षसंमेलन घेणार असल्याची माहिती सयाजी शिंदे यांनी दिली. यासंदर्भात त्यांचा स्वत:चा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

कुरूंद्यातील टोकाई गडावर वनराई फुलवण्यासाठी वृक्षप्रेमी गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्नशील होते. झाडे लावण्यापासून ते जगविण्यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले. खर्चही केला. तब्बल १७५ एकरावर हा टोकाई गड विस्तारला आहे. हा गड हिरवागार करण्यासाठी आता सयाजी शिंदे आणि सिने लेखक अरविंद जगताप यांच्या सह्याद्री देवराई या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्यांच्याच संकल्पनेतून बीड जिल्ह्यातील पालवन शिवारातील माळरान डोंगरावर देवराई फुलवून गेल्या महिन्यात येथे पहिले वृक्षसंमेलन घेण्यात आले. पालवननंतर आता पुढचे पाऊल टोकाईगड असणार आहे. वृक्षप्रेमींच्या संकल्पनेतून येथे देशी वृक्षांसह, सुगंधी-औषधी झाडे लावण्यात आली आहेत. वृक्षप्रेमी दररोज गडावर जाऊन पाणी देत आहेत. आतापर्यंत त्यांच्या या कार्याला प्रशासनाच्या मदतीची जोड मिळत नव्हती. सयाजी शिंदे यांनी हिंगोलीचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्याशी मोबाईलवरून संवाद साधला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची वृक्षप्रेमींनी भेट घेतली.  यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. 

सर्वजण मिळून टोकाईगड हिरवेगार करूया-सयाजी शिंदेबीड जिल्ह्यात पालवनच्या माळरानात वृक्षसंमेलन झाले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता कुरुंदा येथील टोकाईगडावर वृक्षसंमेलन भरविण्यात येणार आहे. 50000 टोकाई भागातील वृक्षप्रेमींनी शाळा, पदाधिकारी, ग्रामस्थांनी जवळपास ५० हजार झाडे लावावीत. 100 मीदेखील टोकाईगड हिरवेगार करण्याचा संकल्प करून १०० लोकांचा ग्रुप तयार करून झाडे लावण्यासह संगोपन करून आपल्याला साथ देण्यास येणार आहे. सर्वांनी सहकार्य केले तर हा गड फुलणारच, असा विश्वास व्हायरल झालेल्या व्हीडिओतून सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला.  

टॅग्स :environmentपर्यावरणHingoliहिंगोलीsayaji shindeसयाजी शिंदेBeedबीड