शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बाळा’चे बदललेले रक्त बाईचे की आईचे? चाैकशी समितीने सादर केलेल्या अहवालाने खळबळ
2
पाकच्या मदतीसाठी चीनने उभारले बंकर; नियंत्रण रेषेलगत कम्युनिकेशन टॉवरही बांधले!
3
सेन्सरच्या त्रुटींमुळे दिल्लीत ५२° तापमानाचा ‘विक्रम’; हवामान विभाग म्हणे- पारा ४६.८° सेल्सिअसच
4
१८ वर्षांनी राहु शनी नक्षत्रात गोचर: ७ राशींना लॉटरी, शेअर बाजारात फायदा; प्रमोशन, धनलाभ योग!
5
तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? जून महिन्यात ठरतील लकी, लाभेल सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!
6
वीकएण्डचा वाजणार बोऱ्या! मध्य रेल्वेवर उद्यापासून तीन दिवस जम्बो ब्लॉक, ९३० फेऱ्या रद्द
7
मनुस्मृती दहन करताना आमदार आव्हाड यांनी फाडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो
8
कीर्ती व्यास हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप; अत्यंत थंड डोक्याने कृत्य केल्याचा वकिलांचा युक्तिवाद
9
Porsche Car Accident: 'बाळा'च्या ब्लड सँपलची ससून रुग्णालयात अदलाबदल; ते खासगी इसम कोण?
10
सचिन वाझेच्या तुरुंगाबाहेर पडण्याबाबतच्या अर्जावर उत्तर द्या; उच्च न्यायालयाचे सीबीआयला निर्देश
11
सरकारी कर्मचारी भ्रष्ट म्हणणे तक्रारदाराला भाेवले; कारवाई रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
12
राधानगरीतील ८४ गावांत वाढणार इको टुरिझम; MSRDCकडून विकास आराखड्याचे काम सुरू
13
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
14
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
15
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
16
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
17
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
18
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
19
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
20
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर

मारहाण करून घर पेटवून दिले; तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 12:05 AM

वसमत तालुक्यातील भेंडेगाव येथे फिर्यादीच्या घरासमोर फटाके वाजविण्याच्या वादातून मारहाण करून घर पेटवून दिल्याची घटना ४ एप्रिल रोजी रात्री १० ते १२ वाजण्याच्या सुमारे घडली असून या प्रकरणी तीन जणांविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरूंदा : वसमत तालुक्यातील भेंडेगाव येथे फिर्यादीच्या घरासमोर फटाके वाजविण्याच्या वादातून मारहाण करून घर पेटवून दिल्याची घटना ४ एप्रिल रोजी रात्री १० ते १२ वाजण्याच्या सुमारे घडली असून या प्रकरणी तीन जणांविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भेंडेगाव येथे फिर्यादी चंद्रमुनी थोरात यांच्या घरासमोर आरोपीतांनी फटाके वाजविले होते. फटाके घरासमोर का वाजविले? हे आरोपीतांना असे विचारले असता आरोपींनी शिवीगाळ करून फिर्यादीस थापड-बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेच्या प्रकरणातून फिर्यादीच्या घराला आग लावून घर पेटवून दिले. त्यामुळे फिर्यादीचे आर्थिक नुकसान झाले आहे. फिर्यादी चंद्रमुनी थोरात यांच्या तक्रारीवरून कुरूंदा पोलिस ठाण्यात आरोपी चंद्रकांत गायकवाड, पुरभाजी गायकवाड, इंदुबाई गायकवाड या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सपोउपनि शंकर इंगोले हे करीत आहेत.वसमतहून नांदेडला मांस पुरवणारे रॅकेट; मांस घेऊन जाणारा आॅटो पकडलावसमत : येथे अवैधरीत्या गोवंशाची कत्तल करून नांदेडला आॅटोद्वारे मांस घेऊन जाणारा आॅटो चेकनाक्यावर कर्मचाऱ्यांनी पकडला. या प्रकाराने वसमत येथून नांदेडला मांस पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी २ लाख ७ हजार रुपयाच्या ऐवजासह एकास अटक केली आहे. येथे गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही वसमत येथे कत्तलखाने चालवले जातात. वसमतहून नांदेडसह विविध शहरात मांस पुरवठा करणारे रॅकेट कार्यरत आहे. मात्र या प्रकाराविरोधात कारवाई कोणी करत नाही. शनिवारी वसमतमध्ये कत्तल केलेल्या गोवंशाचे मांस घेऊन नांदेडला जाणारा आॅॅटो आसेगाव रोडवरील चेकपोस्टवर पकडण्यात आला. आॅटोत ६० किलो मांस असलेले पोते आढळले. २ लाख ७ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. या प्रकरणी सपोनि बळीराम बंदखडके यांनी ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली. यात गोवंशहत्या बंदी कायद्याचे उल्लंघन करून अवैधरित्या कत्तल केलेले गोवंश घेऊन जाणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. यात आॅॅटो क्र. एमएच २६ बी.डी. ०३५२ चा चालक शेख जबी शेख खदीर रा. मुशफरशहा वसमत व गोवंश जनावरे खरेदी करून कत्तल करणारे अन्य इसमांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. चालकास अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपीचा शोध सुरू आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी