शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेपूर्वीच विधानसभेसाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:36 IST

लोकसभा निवडणुकीसाठी आता वर्षभराचा कालावधी राहिला आहे. मात्र त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकाच आधी होतात की काय? अशी परिस्थिती मतदारसंघात घिरट्या घालणा-यांनी निर्माण केली आहे. शिवाय यावरून राजकीय श्रेयवादात शाब्दिक चकमकीही होत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकसभा निवडणुकीसाठी आता वर्षभराचा कालावधी राहिला आहे. मात्र त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकाच आधी होतात की काय? अशी परिस्थिती मतदारसंघात घिरट्या घालणाºयांनी निर्माण केली आहे. शिवाय यावरून राजकीय श्रेयवादात शाब्दिक चकमकीही होत आहेत.हिंगोली जिल्हा हा क्षेत्रफळाने लहान आहे. त्यामुळे हिंगोली लोकसभेला आजूबाजूच्या दोन जिल्ह्यांतील तीन विधानसभा मतदारसंघ जोडलेले आहेत. तर लोकसभेसाठी इच्छुकांची भली मोठी रांग असली तरीही ती या तीन जिल्ह्यांच्या वादात सर्वसमावेशक चेहरा अजूनही समोर येत नाही. त्यातच विद्यमान खा.राजीव सातव यांचे पक्षांतर्गत वाढते वजन पाहता तगडी लढत देणाºयालाच मैदानात उतरविणे क्रमप्राप्त आहे. मोदी लाटेच्या वादळात तेवलेला हा दिवा ही लाट ओसरल्यावर आणखीच प्रखरतेने प्रज्ज्वलित झाला आहे. तसे भाजपकडून माजी खा.शिवाजी माने, माजी खा. सुभाष वानखेडे, माजी खा. सूर्यकांता पाटील या दिग्गजांची नावे चर्चेत आहेत. मात्र यापैकी नेमके कोण मैदानात उतरेल, याची काहीच शाश्वती दिसत नाही. शिवसेनेतही आ.जयप्रकाश मुंदडा, बी.डी. चव्हाण, प्रकाश पाटील देवसरकर यांच्यासह नागेश पाटील आष्टीकर, हेमंत पाटील या नांदेड जिल्ह्यातील दोन आमदारांची नावेही नुसतीच चर्चेत आहेत. राष्ट्रवादी वेगळ्याने लढेल अशी चिन्हे नाहीत. तर बसपा, मनसे, भारिप आदींच्या गोटात सामसूम आहे. मात्र सेना व भाजप एकत्र लढल्यास या दोन्ही पक्षांमध्ये या जागेवरून वाद उभे राहू शकतात. तर विरोधात लढायचे झाले तरीही या पक्षांनी अजून उमेदवारच समोर न आणल्यास सातवांना आव्हान देणे तेवढे सोपे नाही. या पक्षांची तशी रणनीतीही समोर येताना दिसत नाही. तर सातव गुजरातचे प्रभारी झाल्याने लढणार की नाही, हाही प्रश्नच आहे.दुसरीकडे लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणूक लढण्यास उत्सुकांचीच अधिक घाई होताना दिसत आहे. हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आ.तान्हाजी मुटकुळे हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. आता त्यांना आव्हान देण्यासाठी केवळ काँग्रेसचे परंपरागत प्रतिस्पर्धी माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर हे रिंगणात राहतील, असे चित्र वाटत असतानाच राष्ट्रवादीचे आ.रामराव वडकुतेही जोरदार तयारीला लागले. वडकुते-मुटकुळे वादांनी अनेक कार्यक्रमही गाजले आहेत. शिवाय अधून-मधून भैय्या पाटील गोरेगावकर यांच्याही घिरट्या सुरु आहेत. ते आता शिवसेनेत आहेत. मागच्या वेळी राष्ट्रवादीने दिलीप चव्हाण यांना मैदानात उतरविले होते. त्यामुळे गोरेगावकरांनी सेनेचा सेफ मार्ग निवडला आहे. मात्र रामेश्वर शिंदेही सेनेकडून इच्छुक आहेत. तर भाजपचे रामरतन शिंदे यांचीही अधून-मधून चर्चा सुरूच असते. तसे काँग्रेसच्याही विनायकराव देशमुख, रवी पाटील गोरेगावकर आदींची नावे चर्चेत राहतात.कळमनुरी मतदारसंघात तर इच्छुकांची यादी एवढी मोठी आहे की, हा मतदारसंघच या निवडणुकांच्या चर्चेला कारण ठरत आहे. या ठिकाणी काँग्रेसचे विद्यमान आ.संतोष टारफे यांना आव्हान देण्यासाठी शिवसेनेकडून संतोष बांगर हे रणांगणात उतरणार हे जवळपास दिसत आहे. माजी आ.गजानन घुगे यांनीही भाजपप्रवेश करून आपले मनसुबे स्पष्ट केले. मात्र अ‍ॅड. शिवाजी माने यांचीही लोकसभा की विधानसभा ही भूमिका स्पष्ट नाही. याशिवाय या मतदारसंघात युती-आघाडीचे कोणतेच आडाखे न बांधता जो-तो कामाला लागला आहे. यात राष्ट्रवादीचे डॉ.जयदीप देशमुख, रासपचे विनायक भिसे, अपक्ष जि.प.सदस्य अजित मगर आदी अनेकांचा समावेश आहे. हा मतदारसंघ म्हणजे सध्या राजकीय चळवळींचे केंद्र बनला आहे. यात काही इच्छुकांमुळे तर मतदारांचे मनोरंजन होत आहे.वसमत विधानसभा राकॉंचे जयप्रकाश दांडेगावकर व शिवसेनेचे जयप्रकाश मुंदडा या दोन माजी मंत्र्यांच्या परंपरागत लढतीतून बाहेर निघेल, अशी सुतराम शक्यता नाही. भाजपचे शिवाजी जाधव यांनी जि.प., पं.स.त चुणूक दाखविली अन् थेट दिल्लीच गाठली. मतदारांना मात्र मुंदडा व दांडेगावकर हे दोनच नेते रोजच्या दिसण्यातले वाटतात. त्यातच राजू पाटील नवघरे हा आणखी एक नवा चेहरा चर्चेत आला की आणला जात आहे, हे कळायला मार्ग नाही.अनेक नव्या चेहºयांचा उदयमागच्या विधानसभेला आघाडी व युती तुटल्याने अनेक नवे चेहरे विधानसभेच्या दृष्टिने राजकारणात उतरले आहेत. तर काहींना यावेळीही तसे काही चित्र निर्माण झाले तर आपला क्रमांक लागेल, असे वाटत आहे. तर काहीजण सध्या काँग्रेसपेक्षा राकाँचे चांगले बळ असल्याने आम्हाला वाढीव जागा मिळतील, असे सांगून काम करीत आहेत.सेना व भाजपलाच जाणार अवघडशिवसेना व भाजपच्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यातच अनेकांचे उमेदवारी डोळ्यासमोर ठेवून झालेले पक्षप्रवेश भविष्यात एकत्रितपणे लढण्यासाठी डोकेदुखीच ठरणार आहेत. काँग्रेस व राकाँसमोरही ही अडचण असली तरीही त्यात मतांचे मोठे अंतर हा फॅक्टर एकाला माघार घेण्यास भाग पाडू शकतो. मात्र ही केवळ एक राजकीय अटकळच आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliticsराजकारण