शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बसवेश्वर म्हणजे प्रेरणा देणारा झरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:36 IST

येथे शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना व कर्मचारी महासंघ तथा बसवप्रेमी व वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या वतीने २२ एप्रिल रोजी महात्मा बसवेश्वर यांच्या ८८७ व्या जयंती निमित्ताने महावीर भवन येथे व्याख्यामालेचे आयोजन केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथे शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना व कर्मचारी महासंघ तथा बसवप्रेमी व वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या वतीने २२ एप्रिल रोजी महात्मा बसवेश्वर यांच्या ८८७ व्या जयंती निमित्ताने महावीर भवन येथे व्याख्यामालेचे आयोजन केले होते.अध्यक्षस्थानी शिवा संघटनेचे राष्टÑीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, प्रा.किशनराव इमडे, अर्जून सैदाने, धन्यकुमार शिवणकर आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून पुणे येथील उमाकांत शेट्टे होते. यावेळी शेट्टे म्हणाले, म.बसवेश्वर हे १२ व्या शतकातील मानवतावादी समाज सुधारक, महामानव असून त्यांचे विचार सर्वधर्मिय लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. समतेचा संदेश देणारे म. बसवेश्वर लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत. त्यांचे विचार, तत्त्वज्ञान लोकशाहीला आधार आहे, समाजाने यांच्या विचारासाठी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले. शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी बहुजनांचे उद्धारक, म. बसवेश्वर समतेचा संदेश देऊन त्यांचे विचार सामान्य तळागाळातील, सर्वधर्मिय समाजापर्यंत पोहोचविण्यास वेळ आहे. त्यासाठी जनजागृती आवश्यक व्याख्यानमालेचे आयोजन करून आपण अभिनंदनीय काम केले. अध्यक्षीय समारोपात धोंडे यांनी महात्मा बसवेश्वर यांचे विचार मांडले. तर शिवा संघटनेने पाठपुरावा करून शासनाकडून ज्या मागण्या मान्य करून घेतल्या, त्याबद्दल समाज बांधवांनी माहिती दिली. तर समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शिवा संघटनेबद्दल आस्था असणे आवश्यक आहे, असे सांगितले. प्रास्ताविक सुभाष जिरवणकर यांनी केले. त्यामध्ये शिवा संघटना ही विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना नेहमी साथ देणारी संघटना आहे. सूत्रसंचालन प्रा. जयप्रकाश पाटील यांनी तर आभार संजय मेथेकर यांनी मानले.यशस्वीतेसाठी शिवशरण रटकलकर, सुरेशआप्पा घळे, सुभाष जिरवणकर, महेश आप्पा जैनापुरे, रमेश आढळकर, मन्मथ दरगू, वसंतराव शिंदे, गंगाधर मुपकलवार, विशाल गोटरे, सदाशिव सराफ, महादेव राऊत, गजानन तायडे, बाळूआप्पा टाले, ज्ञानेश्वर उन्हाळे, संजय दुबळगुंडे, बाळू फंदे, रघुनाथ मिटकरी, राजेश खके, प्रशांत तुपकरी, संजय मेथेकर, शिवानंद होकर्णे, संतोष काळे यासह पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक