शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

बँकांनी मारले, मिरचीने तारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:02 IST

शेतकऱ्यांना दिलासा : सिल्लोड तालुक्यात विक्रमी लागवड; ४ हजार पोत्यांची आवक

श्यामकुमार पुरेसिल्लोड : सिल्लोड तालुक्यात यावर्षी मिरचीची विक्रमी लागवड करण्यात आली असून सुरुवातीलाच ३८०० ते ४ हजार रुपये क्विंटलचा भाव मिळत असल्याने शेतकरी आनंदात आहेत.शिवना, गोळेगाव, आमठाणा, पानवडोद या मिरचीच्या बाजारपेठेत दररोज तब्बल ४ हजार पोत्यांची आवक येत आहे. पुढील आठवड्यात हीच आवक ८ हजार पोते होईल. गरजेच्या वेळी बँकांनी शेतकºयांना मारले असले तरी मिरचीने तारले आहे. खत, औषधी, मजुरीसाठी शेतकºयांचा हात यामुळे मोकळा झाला आहे. मिरचीने एक प्रकारे शेतकºयांना दिलासा दिल्याचे चित्र दिसत आहे.तालुक्यातील बºयाच शेतकºयांना अजून पीक कर्ज मिळाले नाही, बोंडअळी, पीक विमा मिळाला नाही. अशा संकटाच्या स्थितीत मिरचीने शेतकºयांना दिलासा दिला आहे. नगदी पैसे शेतकºयांना मिळत आहेत. पण हाच भाव स्थिर राहावा, अशी आशा शेतकरी करीत आहेत.नगदी पीक म्हणून ओळख असणाºया सिल्लोड तालुक्यातील तेजा फोर, ईश्वरी, तेजस्विनी या मिरचीला वाशी, मुंबई, कोलकत्ता, नागपूर बाजारपेठेत मागणी आहे. तेजा फोरला सध्या ३८०० रुपये तर ईश्वरी, तेजस्वीला ४२०० ते ४३०० रुपये भाव मिळत असल्याची माहिती शिवना येथील व्यापारी सुनील काळे यांनी दिली.ज्या शेतकºयांनी एप्रिल ते मे दरम्यान मिरची लागवड केली. त्यांची मिरची आता निघणे सुरू झाली आहे. पहिला तोडा आधी कमी येतो त्यानंतर दुसरा तोडा दुपटीने वाढतो. मिरची तोडणीसाठी ४ रुपये किलो मजुरी द्यावी लागत आहे. या शिवाय वाशीचे भाडे मिळून १० ते ११ रुपये खर्च येतो. तरीही शेतकºयांच्या हातात २८०० ते ३२०० रुपये पडतात.मिरचीचे लागवडक्षेत्र वाढू लागलेसिल्लोड तालुक्यात सध्या नगदी पीक म्हणून शेतकरी मिरचीकडे वळले आहेत. २०१३ मध्ये सिल्लोड तालुक्यात केवळ ५ हेक्टर मिरचीची लागवड झाली होती. त्या तुलनेत २०१४ मध्ये २४६ हेक्टर, २०१५-१७४ हेक्टर, २०१६ -२३८४ हेक्टर, २०१७ मध्ये १७७३ हेक्टर लागवड झाली. यावर्षी तब्बल २६७२ हेक्टर क्षेत्रावर मिरचीची लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ८९९ हेक्टरने क्षेत्र वाढले आहे.पाणी कमी पडलेअनेक शेतकºयांना मिरचीसाठी पाणी कमी पडले आहे. विहिरीची पाणीपातळी कमी झाली आहे. जोरदार पाऊस न झाल्याने विहिरींना पाझर फुटला नाही. मल्चिंगवर मिरची लागवड केल्याने पावसाचे पाणी बेडवरून खाली वाहून जाते. यामुळे ठिबकनेच पाणी घ्यावे लागते. यामुळे मोठा पाऊस होईल व विहिरीत पाणी येईल, अशी आशा शेतकºयांना आहे. ज्यांनी मल्चिंग लावली नाही, त्यांना सध्या पडत असलेल्या पावसाचा फायदा होत आहे.४ मुख्य बाजारपेठासिल्लोड तालुक्यात मिरची खरेदीच्या चार मुख्य बाजारपेठा आहेत. त्यात मोठी बाजारपेठ म्हणून शिवन्याची ओळख होती. पण यावर्षी शिवना मागे पडले आहे. शिवन्यात दररोज केवळ २५० ते ३०० पोते आवक होत आहे. त्या तुलनेत आमठाणा येथे २ हजार पोते, गोळेगाव येथे ५०० पोते, पानवडोद येथे १ हजार पोते मिरचीची आवक येत आहे. एक पोत्यात ५० ते ५५ किलो मिरची बसते.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी