शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यात ८0 गावातील ८३ जलस्त्रोतांचे केले अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 19:23 IST

जिल्ह्यात सध्या ८0 गावांची तहान ८३ जलस्त्रोतांच्या अधिग्रहणांद्वारे भागत असून ३ टँकर सुरू आहेत.

ठळक मुद्दे जि.प.ने पाठविलेल्या ४८ पैकी जिल्हा प्रशासनाने  नळयोजना विशेष दुरुस्तीचे २७ प्रस्ताव मंजूर केले विंधन विहिरी ५२४ प्रस्तावित असून अद्याप एकालाही मंजुरी मिळाली नाही.

हिंगोली : यंदा गावात तहसील व पंचायत समितीच्या प्रशासनाकडून तपासणी केल्याशिवाय टंचाईचे उपाय होत नसल्याने अनेक गावांत टंचाईचा सामना करावा लागत असल्याची बोंब लोकप्रतिनिधींच्या आढावा बैठकीत होत आहे. जिल्ह्यात सध्या ८0 गावांची तहान ८३ जलस्त्रोतांच्या अधिग्रहणांद्वारे भागत असून ३ टँकर सुरू आहेत.

यामध्ये हिंगोली तालुक्यातील ७ गावांमध्ये ७ स्त्रोतांचे अधिग्रहण केले आहे. कळमनुरी तालुक्यात एका टँकरसाठी दोन ठिकाणी अधिग्रहण केले असून त्यावरून चार खेपा केल्या जात आहेत. तर माळधावंडा व खापरखेडा या दोन गावांतील २४३२ लोकसंख्येला यावरून पाणी पुरविले जात आहे. याशिवाय १३ गावांसाठी १५ जलस्त्रोतांचे अधिग्रहण केले आहे. सेनगाव तालुक्यात १२ गावांसाठी २0 जलस्त्रोत अधिग्रहित केले आहेत. वसमत तालुक्यात २१ गावांसाठी २३ जलस्त्रोत अधिग्रहित केले. तर औंढा नागनाथ तालुक्यात संघनाईक तांडा येथे टँकरने पाणीपुरवठा केला जात असून १७ गावांसाठी १८ अधिग्रहणे केली आहेत. 

यंदा टंचाई जाणवत असली तरीही अधून-मधून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे त्याची तीव्रता कमी होताच ओरड थांबते. त्यानंतर पुन्हा ही ओरड सुरू होत आहे. जि.प.ने पाठविलेल्या ४८ पैकी जिल्हा प्रशासनाने  नळयोजना विशेष दुरुस्तीचे २७ प्रस्ताव मंजूर केले असल्याचे सांगण्यात आले. तर विंधन विहिरी ५२४ प्रस्तावित असून अद्याप एकालाही मंजुरी मिळाली नाही. तर जि.प.ने नुकतीच जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून यूपीपीची पाणीपाळी टंचाईत मंजूर केली आहे. याचा २८ गावांना फायदा होणार आहे.

वेगवेगळे विभाग टंचाईत अडसरपाणीटंचाईत उपाययोजना करण्यासाठी वेगवेगळे उपाय करण्यास वेगवेगळ्या विभागांकडून प्रस्ताव जातात. एकत्रित कोणतेच काम होत नाही. बोअर घेण्यास यांत्रिकी विभागाकडून कार्यवाही होते. टँकर मंजुरीसाठी तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवावा लागतो.पाणपुरवठा योजनांची दुरुस्ती अथवा तात्पुरती पूरक योजना घेण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग प्रस्ताव पाठवितो. यातील फरकही अनेक ग्रा.पं.ना लवकर कळत नसल्याने बोंब होईपर्यंत टंचाईत उपाययोजना होत नसल्याचे चित्र आहे.

टंचाईत भूर्दंडटंचाईच्या काळात जि.प.च्या इतर उपाययोजनांवर जिल्हा प्रशासन खर्च करते. मात्र इसापूरच्या पाण्याचे आरक्षण करायला लावून त्यावर होणारा खर्चही जि.प.लाच भरावा लागत असल्याची बोंब ऐकायला मिळत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ