लोकमत न्यूज नेटवर्कवसमत/कुरूंदा : वसमत- औंढा रस्त्यावर धामणगाव पाटीजवळ अॅपेला ट्रकने धडक दिली. यात अॅपे उलटून ३ जण जखमी झाले. अॅपेतील फळांचा रस्त्यावर सडा पडला होता.वसमतकडून औंढ्याकडे निघालेल्या अॅपेला धामणगाव पाटीजवळ ट्रक क्र.जी.जे.०६- ए.व्ही. ९९४६ ने पाठीमागून धडक दिली. यात अॅपे उलटला. यातील खालेद शेख कादर (३८), नफीस नुरसाब (४०), अब्दुल हक अब्दुल खादर (४०) हे तिघे जबर जखमी झाले. जखमींना १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. डॉ. रविकुमार करवंदे, विठ्ठल हंबरडे यांनी प्राथमिक उपचार करून एका गंभीर जखमीला नांदेडला रेफर केले.
आॅटोला धडक; तीन जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:13 IST