शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता कर थकल्याने औंढा महावितरण कार्यालय सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 21:02 IST

नगर पंचायतीचा २० वर्षांपासून २२ लक्ष ८४ हजार रुपये मालमत्ता कर थकीत आहे.

औंढा नागनाथ (हिंगोली ) : महावितरण कार्यालयाकडे मागील वीस वर्षांपासून मालमत्ता कर थकीत आहे. वसुलीची कारवाई करत नगरपंचायत कार्यालयाने महावितरण कार्यालयास आज दुपारी सील ठोकले. यामुळे भरउन्हाळ्यात शहरासह ग्रामीण भागातील 52 गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

औंढा नागनाथ येथील महावितरण कार्यालयाकडे नगर पंचायतीचा २० वर्षांपासून २२ लक्ष ८४ हजार रुपये मालमत्ता कर थकीत आहे. कार्यालयाला अनेकवेळा कर भरण्याबाबत नोटीस देण्यात आल्या. मात्र कार्यालयाकडून कर भरणा होत नसल्याने वसुलीसाठी लोक अदालत मध्ये हे प्रकरण गेले असता महावितरणने कर जास्त आकारण्यात आल्याचे कारण देत रक्कम भरण्यास नकार दिला. 

यामुळे नगर पंचायत कार्यालयाचे कर निरीक्षक उत्तम जाधव, प्रकाश तोटालू, विजय महामुने, हरिहर गवळी, नंदकिशोर डाखोरे, मारोती पांढरे, नागेश बुरकुल, अनिल नागरे, विष्णू रानखांबे आदींनी आज दुपारी  २ वाजेच्या सुमारास महावितरण कार्यालय सील केले. कराची रक्कम जमा झाल्यासच सील काढण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.   सील करण्याआधी सब स्टेशनचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. यामुळे शहर व तालुक्यातील 52 गावांचा विद्युत पुरवठा प्रभावित झाला आहे. याबाबत महावितरण विभागाचे उपअभियंता जैन यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी रेकॉर्ड नुसार केवळ 4 ते 5 लाख रुपयांची थकबाकी आहे, वाढीव कर भरण्यास असमर्थ असल्याचे सांगितले. दोन्ही संस्थांच्या वादात मात्र नागरिकांचे ऐन उन्हाळ्यात हाल होत आहेत. 

टॅग्स :TaxकरmahavitaranमहावितरणHingoliहिंगोली