लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राज्यातील दुष्काळाच्या प्रश्नावर लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत खा.राजीव सातव यांनी लक्ष वेधले असून, दुष्काळजन्य परिस्थतीवर मात करण्यासाठी उपाययोजनासंदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे.महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थीती निर्माण झाली आहे. हिंगोली लोकसभा क्षेत्रातील सर्वच भागात दुष्काळी परिस्थीती असतानाही काही तालुके दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांंमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. यासाठी निवेदने दिली, आंदोलने केली, मात्र शासनाने कोणताच दिलासा दिला नाही. संकटात सापडलेल्या शेतकºयांना मदतीची अपेक्षा आहे. अशावेळी या परिस्थीतीवर मात करण्यासाठी दुष्काळग्रस्त शेतकºयांना केंद्र सरकार कडून प्रतिहेक्टर ५० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी व शेतकºयांना विनाव्याज कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी खा.सातव यांनी केली.
दुष्काळप्रश्नी सातवांनी वेधले केंद्राचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 00:13 IST