शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबार करून बँक लुटण्याचा प्रयत्न; रेकॉर्डवरील आरोपीकडून पिस्तूल, काडतुस जप्त

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: October 16, 2023 18:49 IST

पिस्तूल जप्त केलेल्या आरोपीवर हिंगोली व नांदेड जिल्ह्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

हिंगोली : वसमत तालुक्यातील चोंढी येथे काही महिन्यापूर्वी गोळीबार करून बँक लुटण्याचा प्रयत्न झाला होता. यात सहभागी असणाऱ्या रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पिस्तूल व दोन जिवंत काडतूस जप्त केले.

सण, उत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यात अवैध धंदे, बेकायदेशिर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिल्या आहेत. त्या अनुषंगाने विशेष मोहीम राबवून कार्यवाही केली जात आहे. वसमत तालुक्यातील चोंढी येथे गोळीबार करून बँक लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीकडे पिस्तूल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने वसमत गाठले. त्यानंतर अयाज अहेमद मोहमद गफूर (रा. बुखारी तकीया, वसमत) यास ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता एक पिस्तूल व दोन जिवंत काडतूस असल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याने लपून ठेवलेली पिस्तूल व दोन जिवंत काडतूसे पथकाने जप्त केली. या प्रकरणी रात्री उशिरा आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार शेख बाबर, विठ्ठल कोळेकर, गणेश लेकुळे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, तुषार ठाकरे यांच्या पथकाने केली. 

दोन जिल्ह्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखलपिस्तूल जप्त केलेल्या आरोपीवर हिंगोली व नांदेड जिल्ह्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. वसमत, कुरूंदा येथे प्रत्येकी एक जबरी चोरी व दरोडा, अर्धापूर पोलिस ठाणे हद्दीत एक जबरी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

गंभीर गुन्हा रोखण्यात पथकाला यशस्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने काही दिवसांपूर्वी हट्टा पोलिस ठाणे हद्दीत आंतरजिल्हा दरोडेखोराला पिस्तूल बाळगताना पकडले होते. आता पुन्हा एक पिस्तूल जप्त केली. गंभीर स्वरूपाचे गुन्हे असणाऱ्या आरोपीस गुन्हा करण्यापूर्वीच पकडले. या कार्यवाहीमुळे  गंभीर स्वरूपाचा गुन्हा रोखण्यात पोलिसांना यश आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली