शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटाव पथकावर हल्ला; दगडफेकीमुळे हिंगोलीत तणावाची स्थिती

By रमेश वाबळे | Updated: December 17, 2022 17:03 IST

अतिक्रमणधारकांनी अचानक भूमिका बदलल्याने या परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

हिंगोली : येथील जलेश्वर तलाव परिसरातील उर्वरित अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना देण्यासाठी गेलेल्या न.प. व पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकावर संतप्त अतिक्रमणधारकांनी अचानक हल्ला चढविला. यात एक कर्मचारी जखमी असून ऑटो व पोलिस जीपचे नुकसान झाले.

१६ डिसेंबर रोजी जलेश्वर तलाव परिसरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. वरिष्ठ अधिकारी व मोठा पोलिस बंदोबस्त असल्याने अतिक्रमणधारकांच्या आक्रमकतेला नियंत्रणात ठेवता आले होते. १८ डिसेंबरला काही ग्रामपंचायतींचे मतदान असल्याने प्रशासन त्याच्या नियोजनात आज व्यस्त होते. त्यामुळे मोहिमेला अर्धविराम देत सोमवारी ती राबविण्याचे ठरले होते. तरीही सूचना देण्यासाठी दुपारी १ वाजेच्या सुमारास हे पथक गेले असता अचानक दगडफेक झाली. यात पोलिसांच्या वाहनाच्या काचा फुटल्या. ऑटोवरही दगडफेक केली. तो उलटवून टाकला. त्यावरील भोंगा फोडला. 

यात न.प.चे कर्मचारी पंडित मस्के यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. ही घटना घडल्यानंतर पोलिसांना मनुष्यबळ जमविण्यासाठी जुळवाजुवळ करावी लागली. पोलिस कर्मचारी इतर बंदोबस्ताला असल्याने घटनास्थळी एक तासापेक्षा जास्त काळ गोंधळाचे वातावरण होते. काल अतिक्रमण हटावच्या पहिल्या दिवशी जमाव आक्रमक होण्याची भीती असल्याने प्रशासनाने सर्व तयारी केली होती. मात्र, तेव्हा काहीच झाले नाही. आज अतिक्रमण काढले जात नसतानाही हा प्रकार घडल्याने प्रशासनही चक्रावून गेले होते. तर अतिक्रमणधारकांनी आपली भूमिका बदलल्याचे दिसत आहे.

घटनेनंतरही दगडफेकही घटना घडल्यानंतर अंबिका टॉकीज परिसरातही अतिक्रमणधारकांनी दगडफेक केली. तर या बाजूने व तलावाच्या दुसऱ्या बाजूने रस्ता बंद केला. दगडफेक सुरू केली. वाहने व पादचाऱ्यांना अटकाव केला. हे करणाऱ्यांत महिलाच जास्त असल्याने इतर पोलिसांना काहीच करता येत नव्हते. महिला पोलिस बळ आल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, पंडित कच्छवे यांच्यासह मोठा फौजफाटा येथे दाखल झाला.

तणावाची स्थिती लागलीच नियंत्रणातअतिक्रमणधारकांनी अचानक भूमिका बदलल्याने या परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिस अधीक्षकांनी परिसर पाहणी केल्यानंतर तणाव निवळला. मात्र, या ठिकाणी बघ्यांची गर्दीही मोठ्या प्रमाणात झाली होती. दगडफेकीनंतर सैरावैरा धावणाऱ्या गर्दीमुळेही वातावरण तंग होते. मात्र, पोलिसांची कुमक येताच स्थिती लागलीच नियंत्रणात आली.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliceपोलिसEnchroachmentअतिक्रमण