शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाप्रमुखावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 23:09 IST

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्यावर कळमनुरीचे काँग्रेसचे आ. डॉ.संतोष टारफे यांनी औंढा पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्यावर कळमनुरीचे काँग्रेसचे आ. डॉ.संतोष टारफे यांनी औंढा पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.२९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेदरम्यान औंढा तहसीलच्या प्रांगणात झालेल्या जाहीर सभेत जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची व्हिडीओ क्लिप समोर आल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. ध्वनीक्षेपकावर दोन ते अडीच हजार लोकांसमोर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन फिर्यादीचा अवमान केल्याप्रकरणी औंढा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची तक्रार दाखल करण्यात आली.सदरील घटना २९ रोजी घडलेली असली तरी आ. संतोष टारफे यांनी ४ डिसेंबर रोजी अखेर गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधीक्षक सिध्देश्वर भोरे हे करणार आहेत.दरम्यान, कालपासून या घटनेबाबत चर्चा होती. काल काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले होते. आज पुन्हा आ.टारफे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांची भेट घेतली. त्यानंतर औंढा पोलीस ठाण्यात जावून गुन्हा दाखल करण्यात आला.दरम्यान, या घटनेमुळे काँग्रेसने बुधवारी मोर्चाचे आयोजन केल्यानंतर शिवसेनेनेही कळमनुरी व औंढ्यात बंदचे आवाहन केले आहे.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी अतिशय खालच्या पातळीवर टीका केल्याने खेदाने अ‍ॅट्रॉसिटी दाखल करावी लागली. आम्ही या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यास विरोध करतो. मात्र जात माहिती असूनही असा अवमान केल्याने कायदेशिर सल्ला घेतल्यानंतरच गुन्हा दाखल केला. दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी मोर्चा होता. माझ्या मतदारसंघातील चार सर्कल दुष्काळग्रस्तांच्या यादीत नाहीत. त्यासाठी मी निवेदनेही दिली. तरीही अशाप्रकारची टीका केल्याने समर्थकांनी गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले, असे आ.टारफे म्हणाले.संतोष बांगर यांना अटक व्हावी, स्थगिती दिलेली तडिपारी पुन्हा नियमित करावी, त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी आदी मागण्यांसाठी सर्वसमावेशक निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी