शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

महसूलच्या पथकावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:58 IST

गौण खनिजाची चोरटी वाहतूक रोखणाऱ्या गस्ती पथकातील तलाठ्यावर अवैध वाळू वाहतूक करणाºयांनी कोयते व लाकडी दंडुके घेऊन प्राणघातक हल्ला करून पसार झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास औंढा तालुक्यातील गोळेगाव येथे घडली. यात तलाठी विठ्ठल शेळके हे जखमी झाले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : गौण खनिजाची चोरटी वाहतूक रोखणाऱ्या गस्ती पथकातील तलाठ्यावर अवैध वाळू वाहतूक करणाºयांनी कोयते व लाकडी दंडुके घेऊन प्राणघातक हल्ला करून पसार झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास औंढा तालुक्यातील गोळेगाव येथे घडली. यात तलाठी विठ्ठल शेळके हे जखमी झाले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.औंढा नागनाथ तालुक्यातील वाळू घाटांचा मागच्याच आठवड्यात जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी आढावा घेऊन चोरटी अवैध वाळू उपसा वाहतुकीवर कडक कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने तहसील कार्यालयांतर्गत अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागातर्फे विशेष गस्ती पथक तयार करण्यात आले. २६ आॅक्टोबर रोजी रात्री १२ च्या दरम्यान सदर पथक गस्तीवर असतांना जिंतूर रोडवरील गोळेगाव येथे एम.एच. ३८ डी. ३३७७ या क्रमांकाचे टिप्पर शासनाचे महसूल बुडवून अवैध वाळू वाहतूक करीत असल्याची माहिती तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना मिळाली. त्यांनी पोलीस सोबत घेऊन टिप्परचा पाठलाग केला. यावेळी पथकातील तलाठी विठ्ठल शेळके यांनी टिप्पर रोखण्याचा प्रयत्न केला असता अवैध वाळू वाहतूक करणारे आरोपी राहुल घुगे, सचिन शेषेराव बांगर व इतर दहा ते बारा जणांनी तलाठ्यावर प्राणघातक हल्ला करून मारहाण करीत टिप्परसहित पसार झाले. मारहाणीत तलाठी शेळके जखमी झाले असून रुग्णालयात उपचार घेत आहेत. याप्रकरणी विठ्ठल शेळके यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा आणून कर्तव्यावर असलेल्या कर्मचाºयांवर लाकडी दांडा, कोयत्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तसेच शासनाचा महसूल बुडवून गौण खनिजाची चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी आरोपी राहुल घुगे, सचिन बांगर व इतर दहा ते बारा जणांवर गौनखनिज कायदा १९७७ महसूल अधिनियम व भादंविनुसार विविध कलमान्वये औंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. तपास पोनि कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि राहुल तायडे, अफसर पठाण हे करीत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी