जनावरांचा चारा महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:28 AM2021-03-06T04:28:54+5:302021-03-06T04:28:54+5:30

विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढली हिंगोली : जिल्ह्यात सध्या १ ते ७ मार्चपर्यंत संचारबंदीचा नियम लागू करण्यात आला आहे. यामुळे ...

Animal fodder became more expensive | जनावरांचा चारा महागला

जनावरांचा चारा महागला

Next

विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढली

हिंगोली : जिल्ह्यात सध्या १ ते ७ मार्चपर्यंत संचारबंदीचा नियम लागू करण्यात आला आहे. यामुळे सर्व बाजारपेठ बंद आहे. तरिही बरेच नागरिक विनाकारण बाजारपेठेसह शहरात मुक्तपणे फिरताना दिसून येत आहेत. शासनाने कोविडचा धोका लक्षात घेता, संचारबंदीचा नियम लागू केलेला आहे. पण नागरिकांकडून या नियमाला केराची टोपली दाखविण्यात येत आहे.

गावात पाणीटंचाईच्या झळा

फाळेगाव : हिंगोली तालुक्यातील फाळेगावातील विहीर, बोअर, ओढे कोरडे ठाक पडले आहेत. यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावात पाणी मिळत नसल्यामुळे बरेच ग्रामस्थ पाण्याच्या शोधात वणवण भटकंती करीत आहे. बरेच ग्रामस्थ विकतचे पाणी आणून आपले काम भागवित आहे. यामुळे मार्च महिन्यातच गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

Web Title: Animal fodder became more expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.