शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या रुग्णवाहिका चालकासह 2 अपघातग्रस्तांचे निधन, 4 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 20:15 IST

नांदेड-हिंगोली राष्ट्रीय महामार्गावरील हिवरा पाटीजवळ झाला अपघात

गोविंद टेकाळेअर्धापूर (नांदेड ) :नांदेड - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातग्रस्त पुढील उपचारासाठी नेत असतांना वरुड तांड्या जवळ झालेल्या अपघातात रूग्णवाहीका चालक ठार झाला असून चालक बळीराम दत्तराव वाघमारे व अपघात ग्रस्त किशन गोवंदे असे मृतांचे नाव आहे. ही घटना आज सायंकाळी घडली असून एका अपघात ग्रस्त रुग्णास पुढील उपचारासाठी नांदेड येथे घेऊन जाणाऱ्या रूग्णवाहीकेचा अपघात घडला असल्याची माहिती आहे. सुधाकर पंडित रा. हिवरा वय ४७ यांचे उपचारादरम्यान नांदेड येथील शासकीय रूग्णालयात रात्री ८:४० सुमारास निधन झाले.

‌‌सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हिवरा पाटी जवळ किशन गोवंदे राहणार हिवरा यांचा अपघात झाला असता त्यांना पुढील उपचारासाठी प्राथमिक रुग्णालय डोंगरकडा येथे दाखल करण्यात आले होते. गंभीर जखमी असल्याने डॉक्टरांनी त्यांना डोंगरकडा येथील १०२ रुग्णवाहिकेत पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविले.

प्राथमिक आरोग्य केंद्र डोंगरकडा ता. कळमनुरी जि. हिंगोली येथील १०२ रुग्णवाहिकेत रुग्णाला पुढील उपचारासाठी नांदेड येथे घेऊन जात असतांना वरुड तांड्यापासून २०० मीटर अंतरावर १०२ रुग्णवाहिक क्र.( एम.एच.३८ एक्स २४४३ ) व हायवा ट्रक दोघांची समोरासमोर जबर धडक झाली या भीषण अपघातात रुग्णवाहिका चालक बळीराम वाघमारे वय ३५ यांचा घटनास्थळी मृत्यू झाला व अपघात ग्रस्त किशन गोवंदे कृष्णा राठोड वय १४ हे तिघे गंभीर जखमी झाले.

अपघात ग्रस्ताचे नातेवाईक अन्य चौघे जण किरकोळ जखमी झाले होते. सर्व जखमींना अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी ६२ वर्षीय अपघातग्रस्त किशन गोवंदे रा.हिवरा यांना मयत घोषित केले. अन्य जखमींना कृष्णा राठोड वय १४ यांना महामार्ग रुग्णवाहिकेने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. किशन गोवंदे यांचा मृतदेह अर्धापूर ग्रामीण येथे व चालक बळीराम वाघमारे यांचा मृतदेह डोंगरकडा प्राथमिक रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी ठेवला आहे. सुधाकर पंडित रा. हिवरा वय ४७ यांचे उपचारादरम्यान नांदेड येथील शासकीय रुग्णालयात रात्री ८:४० सुमारास निधन झाले.

टॅग्स :AccidentअपघातHingoliहिंगोलीNandedनांदेड