रात्री उशिरापर्यंत निराधारांचे पगार वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:28 AM2021-04-11T04:28:45+5:302021-04-11T04:28:45+5:30

हिंगोली : परभणी मध्यवर्ती बँकेच्या शाखेत निराधारांची गर्दी झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित होताच, शुक्रवारी पुन्हा निराधारांना रात्री उशिरापर्यंत ...

Allocation of salaries to the homeless till late at night | रात्री उशिरापर्यंत निराधारांचे पगार वाटप

रात्री उशिरापर्यंत निराधारांचे पगार वाटप

Next

हिंगोली : परभणी मध्यवर्ती बँकेच्या शाखेत निराधारांची गर्दी झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित होताच, शुक्रवारी पुन्हा निराधारांना रात्री उशिरापर्यंत रक्कम वाटप करून मागील दोन दिवसांत बँकेत पासबुक जमा झालेल्या सर्व १,१०० जणांची रक्कम अदा केली. हिंगोलीत गुरुवारी परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सामाजिक अंतर, सॅनिटायझर व मास्क अशा कोणत्याच नियमांचे पालन केले जात नव्हते. त्यातच दोन ते तीन दिवसांपासून बँकेत पासबुक दिल्याचे सांगून ही निराधार मंडळी गाऱ्हाणे मांडत होती. मात्र, तीन महिन्यांनी एकदा ही रक्कम मिळते. त्यामुळे निराधारांना पैशांची आवश्यकता असल्याने ते रोजच चकरा मारतात. यात कोरोनाचा संसर्ग झाला, तर परिस्थिती अवघड होण्याची भीती होती. अशा वेळी या लोकांना त्यांची रक्कम वेळेत अदा करून तत्काळ मुक्त करणे गरजेचे होते. मात्र, बँकेतही मनुष्यबळाचा अभाव असल्याने हे शक्य होत नव्हते. परिणामी, ही मंडळी दलालांचा आधार घेत असल्याचे समोर आले होते.

बँकेचे शाखा व्यवस्थापक दीपक सरनाईक यांनी पुन्हा शुक्रवारीही निराधारांची रक्कम वाटप करण्यासाठी सांगून, मागील तीन दिवसांत पासबुक जमा केलेल्या सर्वांना रक्कम अदा करण्यास सांगितले. त्यानंतर, शुक्रवारपर्यंत १,१०० लाभार्थ्यांना ४० ते ४५ लाखांची रक्कम अदा करण्यात आली आहे. मागील तीन महिन्यांची निराधारांची पगार जमा झालेली आहे, तर परभणी मध्यवर्ती बँकेच्या या शाखेत एकूण २,७०० जणांचे खाते आहे. त्यामुळे आणखी १,६०० लाभार्थ्यांना पगार अदा करणे बाकी आहे. त्यामुळे आणखी काही काळ निराधारांच्या पगारासाठीची ही गर्दी राहणार असल्याचे दिसत आहे.

Web Title: Allocation of salaries to the homeless till late at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.