शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

१२ वर्षांनंतर कयाधूचा रौद्रावतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:23 AM

मागील दोन ते तीन दिवसांपासून तालुक्यात संततधार पाऊस पडत आहे. या पाण्यामुळे कयाधू नदीला पुर आल्याने नदीतील पाणी शेतामध्ये घुसून हजारो हेक्टर जमिनीवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. २00६ नंतर कयाधूचा पहिल्यांदाच एवढा रौद्रावतार पहायला मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : मागील दोन ते तीन दिवसांपासून तालुक्यात संततधार पाऊस पडत आहे. या पाण्यामुळे कयाधू नदीला पुर आल्याने नदीतील पाणी शेतामध्ये घुसून हजारो हेक्टर जमिनीवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. २00६ नंतर कयाधूचा पहिल्यांदाच एवढा रौद्रावतार पहायला मिळाला.कयाधू नदीला पूर आल्याने सोडेगाव येथे पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे सोडेगाव, नांदापूर, असोला, बोल्डा, बोल्डावाडी, करवाडी, हरवाडी आदी गावांचा संपर्क तुटला आहे. २० आॅगस्टच्या मध्यरात्रीपासूनच पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. तर कोंढूर, डोंगरगाव पूल, शेवाळा, चिखली, गोर्लेगाव या गावाला पुराचे पाणी भिडले आहे. कयाधू नदीवर सावंगी (भू), चाफनाथ, सोडेगाव, सालेगाव, नांदापूर, डिग्रस कोंढूर, कसबे धावंडा, येगाव, चिखली, शेवाळा, येलकी, पिंपरी बु., सावळी, डोंगरगाव पुल आदी १४ गावे वसलेली आहे. या नदीला पुर आल्याने पुराचे पाणी शेतामध्ये घुसून हजारो हेक्टर जमिनीवरील पिके पाण्याखाली बुडाली आहेत.ही पिके हातची गेली असून शेतकरी पिकांना पाण्याखाली पाहून हतबल झाला आहे. तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी कोंढूर, शेवाळा, चिखली, गोर्लेगाव आदी गावांना भेटी देवून परिस्थितीची पाहणी केली व नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले.कयाधू नदीच्या काठावरील गावातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी जि.प. सदस्य बाळासाहेब मगर यांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. २१ आॅगस्ट रोजी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असून त्यामुळे जनजीवन दिवसभर विस्कळीत झाले होते. शाळेतही विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावलेली होती तर शासकीय कार्यालयातही शुकशुकाट होता. विहिरी, नाले, तुडूंब भरून वाहत आहेत.जिल्ह्यात मंडळनिहाय पर्जन्यमान असे हिंगोली-८१, खांबाळा-६५, माळहिवरा-७८, सिरसम बु.-७७, बासंबा ८२, नर्सी ना.-४८, डिग्रस -३७, कळमनुरी-९0, नांदापूर-९५, आखाडा बाळापूर-७५, डोंगरकडा-५८, वारंगा फाटा-६१, वाकोडी-१८, सेनगाव-४0, गोरेगाव-५0, आजेगाव-५५, साखरा-१२,पानकनेरगाव-४५, हत्ता-४८, वसमत-३२, हट्टा-६१, गिरगाव-३७, कुरुंदा-६0, टेंभूर्णी-३५, आंबा-६0, हयातनगर-७४, औंढा ना.-८७, जवळा बा.-७९, येहळेगाव-९३, साळणा-७७ मिमी. जिल्ह्याची एकूण सरासरी ६१.९६ मिमी आहे.जिल्ह्याचे यंदाचे आतापर्यंतचे पर्जन्य ६४३.0६ मिमी झाले. वार्षिक सरासरीच्या ७२ टक्के पर्जन्य झाले. यात हिंगोली-७३.४0, वसमत-६३.८१, कळमनुरी-७७.२८, औंढा-८१.९0, सेनगाव-६४.८0 टक्के आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीRainपाऊस