शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सेनगाव तालुक्यात आरोग्य केंद्रांना रिक्त पदांचे ग्रहणच ; १२ पैकी ६ पदे रिक्त असल्याने रूग्णांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 13:52 IST

सेनगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेची आरोग्य सेवा सांभाळणारी आरोग्य यंत्रणा वैद्यकीय अधिकार्‍यांच्या रिक्त पदांमुळे ढेपाळली आहे. तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकार्‍यांची तब्बल सहा पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत.

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेची आरोग्य सेवा सांभाळणारी आरोग्य यंत्रणा वैद्यकीय अधिकार्‍यांच्या रिक्त पदांमुळे ढेपाळली आहे. तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकार्‍यांची तब्बल सहा पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत.

शासनाने ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य सांभाळण्यासाठी ३० हजार लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र देण्याचे धोरण ठरविले आहे. जवळपास २ लाख १० हजार लोकसंख्या असलेल्या सेनगाव तालुक्यात या निकषाची अंमलबजावणी झालीच नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रात मंजूर वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे वर्षानुवर्षे रिक्त राहत असल्याची शोकांतिका आहे. तालुक्याची एकूण लोकसंख्या जवळपास २ लाख १० हजार असून तालुक्यात गोरेगाव, कवठा, साखरा, कापडसिंगी हे चार प्राथमिक आरोग्य केंद्र तर पानकनेरगाव, पुसेगाव हे प्राथमिक पूर्वउपचार केंद्र कार्यरत आहेत. तसेच दोन वर्षांपूर्वी ब्रह्मवाडी व भानखेडा या दोन नव्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना शासनाने मंजुरी दिली आहे. तर आजेगाव येथे नवीन प्रा.आ. केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे.

या तिन्ही प्रा.आ. केंद्रांचे घोडे कागदोपत्रीच दामटले जात असून ते पुढे सरकले नाही. अशा स्थितीत आहेत त्या प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थिती दयनिय झाली आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने आरोग्य सेवा नावालाच उरली आहे. आरोग्य केंद्रात उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी नसल्याने तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे रूग्णांनीही पाठ फिरविली आहे.गोरेगाव प्रा.आ. केंद्रात वैद्यकीय अधिकार्‍यांच्या एकूण तीन पदांपैकी एक पद रिक्त आहे. कौठा येथील केंद्रात दोनपैकी एक पद रिक्त आहे. तर साखरा प्रा.आ. केंद्रात तीन पदांपैकी एक पद रिक्त आहे. तर कापडसिंगी प्रा.आ. केंद्रातील दोन्ही वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे एक वर्षापासून रिक्त आहेत.

तालुक्यातील सर्वच प्रा.आ. केंद्रात वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होताना दिसत आहे. तालुक्यातील संस्थात्मक प्रसुती, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, लसीकरण, साथरोग उपाययोजना यासह अन्य उपचार सुविधांवर याचा परिणाम जाणवत असून वैद्यकीय अधिकार्‍यांची रिक्त पदे भरण्याकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनानेही दुर्लक्ष केले आहे.

पाठपुरावा केला जात आहे सेनगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकार्‍यांची एकूण १२ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सहा पदे रिक्त आहेत. ही रिक्त असलेली पदे भरण्यासाठी जि.प.कडे पाठपुरावा केला जात असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे यांनी दिली आहे.

रूग्णांची गैरसोयवैद्यकीय अधिकार्‍यांची अनेक पदे रिक्त असल्याचा परिणाम रूग्ण सेवेवर होताना दिसत आहे. त्यामुळे रूग्णांची गैरसोय होत असून उपचारासाठी रूग्णांना खाजगी रूग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यHingoliहिंगोलीdoctorडॉक्टरmedicineऔषधं