शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

पुजाऱ्यास लुटून आरोपींची गुवाहाटी सफर; सरपंचाच्या मुलासह पाचजण जेरबंद

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: February 4, 2023 19:08 IST

पिस्टलचा धाक दाखवून पुजाऱ्यास लुटणारे पाच आरोपी जेरबंद; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली :  येथील खडेश्वर बाबा आश्रमातील पुजाऱ्याच्या डोक्याला पिस्तूल लावून ऐवज लुटणाऱ्या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून पिस्टल, जिवंत काडतूस, सोन्याचे दागिणे असा एकूण ३ लाख २४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

हिंगोली शहराजवळील चिखलवाडी भागातील खडेश्वर बाबा आश्रमातील सुमेरपुरी शंभुपुरी महाराज या पुजाऱ्याच्या डोक्याला पिस्टल लावून दरोडेखोरांनी सोन्याच्या अंगठ्या, रोख रक्कम असा ऐवज लुटला होता. या घटनेमुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांनी दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यावरून पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार संभाजी  लेकूळे, भगवान आडे, गजानन पोकळे, ज्ञानेश्वर पायघन, गणेश लेकुळे, प्रशात वाघमारे, शेख जावेद, प्रमोद थोरात, रोहित मुदीराज, दिपक पाटील यांच्या पथकाने तपास सुरू केला होता.

त्यानुसार या घटनेत ओमसाई शिवाजी खरात, प्रदिप उत्तमराव गायकवाड (दोघे रा. गंगानगर हिंगोली), कैलास शिवराम देवकर (रा. गांधीनगर गोरेगाव), अंकुश जालिंदर गायकवाड (रा. इंदिरानगर हिंगोली), राहूल विठ्ठल धनवट (रा. साखरखेर्डा ता. सिंदखेड राजा) यांचा सहभाग असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने पाचही जणांना ताब्यात घेत विचारपूस केली. तेव्हा या घटनेत सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून एक पिस्टल, तीन जीवंत काडतूस, सोन्याचे दागिणे, दोन दुचाकी, मोबाईल असा एकूण ३ लाख २४ हजारांचा मुद्देूमाल जप्त केला. 

दोघे पोहचले गुवाहटीला; विमानाने परतलेपुजाऱ्यास लुटल्यानंतर यातील ओमसाई खरात व प्रदिप गायकवाड या दोन आरोपीस एका शेतातून ताब्यात घेतले. तर कैलास देवकर व अंकुश गायकवाड हे दोघे गुवाहटीला पळून गेले होते. तर राहूल धनवट पुण्यात लपून बसला होता. दोघे गुवाहटीला असल्याचे समजल्याने पोलिसांनी त्यांना विश्वासात घेवून विमानाने परत येण्याचे आवाहन केले. त्यानुसार दोघेजण थेट विमानाने नागपूरपर्यंत व पुढे वाहनाने हिंगोलीत परतले. 

एकजण निघाला सरपंचाचा मुलगायातील एका आरोपीची आई सरपंच तर वडील सेवानिवृत्त ग्रामसेवक असल्याचे पोलिसांनी सांगितले. एक वर्षापूवी ओमसाई यास विशाल सांगळे (रा. वंजारवाडा) याने पिस्टल दिले होते. 

वर्षभरात तीन दरोड्याचा उलगडायेथील स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि शिवसांब घेवारे यांच्या पथकाला वर्षभरात तीन दरोडा प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आले आहे. या पथकाने सुराणा नगर,  बियाणी नगर, तसेच उमरा फाटा येथील दरोडा प्रकरणातील आरोपीस जेरबंद केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली