शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मित्राच्या लग्नासाठी जाणाऱ्या दोघा भावांचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू

By विजय पाटील | Updated: April 14, 2023 19:23 IST

नांदेड ते वारंगा मार्गावर जामगव्हाण पाटीजवळ झाला अपघात

हिंगोली: मित्राच्या लग्नासाठी पुण्याहून गावाकडे आलेल्या युवकाचा नांदेड ते हिंगोली राष्ट्रीय महामार्गावरील जामगव्हाण  पाटीजवळ  (ता. कळमनुरी) अपघातात मृत्यू झाला. ही घटना १४ एप्रिल रोजी घडली.

नांदेड ते हिंगोली राष्ट्रीय महामार्गावरील जामगव्हाण पाटीजवळ पाठीमागून येणाऱ्या ट्रकने मोटारसायकलला ओव्हरटेक केली. यादरम्यान ट्रकने मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात अविनाश बापूराव जाधव (रा. पेवा, ता. हदगाव, जि. नांदेड) येथील युवक जागीच ठार झाला तर एकजण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजेदरम्यान घडली. 

अविनाश जाधव व देवानंद संजय जाधव दोघे चुलतभाऊ पुण्याला खासगी रुग्णालयात काम करीत होते. गावाकडे मित्राच्या लग्नासाठी मोटारसायकल (क्र. एमएच १४ केएम ३१५९) वरून गावाकडे नांदेड ते वारंगा मार्गाने जात असताना जामगव्हाण पाटीजवळ पाठीमागून येणाऱ्या ट्रक क्रमांक (जीजे ०३-बीडब्ल्यू-८५३१) ने मोटारसायकलला ओव्हरटेक करताना धडक दिली. त्यामुळे अविनाश जाधव हा युवक जागीच ठार झाला असून, देवानंद जाधव हा जखमी झाला.

अपघाताची माहिती मिळताच जमादार शेख बाबर, प्रभाकर भोंग यांनी घटनास्थळी भेट दिली. सदरील ट्रक अपघात स्थळावरून जात असताना पोलिसांनी पाठलाग करून डोंगरगावजवळ ट्रक पकडला. डोंगरकडा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद आतकुरकर, कलीम, प्रशांत स्वामी यांनी शवविच्छेदन केले.

टॅग्स :AccidentअपघातHingoliहिंगोली