शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

५0 टक्के जलसाठे अजूनही ज्योत्याखालीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:25 IST

जिल्ह्यातील तीनपैकी इसापूर धरणात ३ टक्के जलसाठा झाला असून इतर दोन धरणे मृतसाठ्यात आहेत. तर लघुपाटबंधारेच्या २५ पैकी केवळ १२ तलावांमध्येच २५ टक्क्यांच्या आत जलसाठा झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील तीनपैकी इसापूर धरणात ३ टक्के जलसाठा झाला असून इतर दोन धरणे मृतसाठ्यात आहेत. तर लघुपाटबंधारेच्या २५ पैकी केवळ १२ तलावांमध्येच २५ टक्क्यांच्या आत जलसाठा झाला आहे.हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत २७.५0 टक्के पर्जन्यमान झाले आहे. यात हिंगोली २४५ मिमी, वसमत २७४ मिमी, कळमनुरी-२४0 मिमी, औंढा नागनाथ २४८ मिमी तर सेनगाव तालुक्यात २२0 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात या पावसाळ्यात आतापर्यंत सरासरी २४४ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक २९.६१ टक्के पर्जन्य औंढा नागनाथ तालुक्यात झाले आहे. तर कळमनुरीत सर्वांत कमी २६.१८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर व येलदरी ही दोन्ही धरणे मृतसाठ्यातच आहेत. इसापूर धरणात ३५.८५ दलघमी जिवंतसाठा असून हे प्रमाण पूर्ण क्षमतेच्या ३.७२ टक्के एवढे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणेही अजून कोरडीच असल्यात जमा आहेत. मागील आठ दिवसांपासून पावसाचाही पत्ता नाही. ठरावीक दिवशीच अचानक अतिवृष्टी होत असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.हिंगोली तालुक्यात पारोळा ७, वडद-९, चोरजवळा-१२, सवड-४, पेडगाव ३, हातगाव १९ टक्के भरले आहे. तर हिरडी जोत्याखाली व भाटेगावचा अहवालच नाही. सेनगाव तालुक्यातील सवना व पिंपरी तलाव प्रत्येकी २३ टक्के भरला असून बाभूळगाव व घोडदरी तलाव जोत्याखाली आहेत. औंढा तालुक्यातील मरसूळ ३, औंढा-६, पिंपळदरी तलाव २४ टक्के भरला आहे. तर वाळकी, सुरेगाव, सेंदूरसना, पुरजळ, वंजारवाडी, काकडदाबा, केळी हे तलाव जोत्याखाली आहेत. कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी, बोथी, दांडेगाव हे तलाव जोत्याखाली असून देवधरी ३ टक्के भरले आहे. वसमत तालुक्यातील राजवाडी तलावही अजून जोत्याखाली आहे. कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाºयांपैकी चिंचखेडा, खेर्डा, खोलगाडगा, राहटी बंधाºयात १८.३८ टक्के जलसाठा असल्याची नोंद प्रशासनाकडे झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊसwater shortageपाणीटंचाई