शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांना शिवीगाळ; गुन्हा नोंदविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 00:34 IST

औंढा नागनाथ येथे शिवसेनेतर्फे २९ नोव्हेंबर रोजी मोर्चा काढला होता. त्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी कळमनुरी मतदारसंघाचे आमदार डॉ. संतोष टारफे यांना अर्वाच्य शिवीगाळ केल्याचा आरोप करून ३ डिसेंबर रोजी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांची भेट घेतली. तर यात गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : औंढा नागनाथ येथे शिवसेनेतर्फे २९ नोव्हेंबर रोजी मोर्चा काढला होता. त्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी कळमनुरी मतदारसंघाचे आमदार डॉ. संतोष टारफे यांना अर्वाच्य शिवीगाळ केल्याचा आरोप करून ३ डिसेंबर रोजी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांची भेट घेतली. तर यात गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.औंढा नागनाथ येथील तहसील कार्यालयावर २९ नोव्हेंबर रोजी शिवसेनेतर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. यावेळी मोर्चात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी आ. डॉ. संतोष टारफे यांना जाणीवपूर्वक शिवीगाळ केल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी केला. त्यामुळे अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.यावेळी जिल्हाध्यक्ष बोंढारे म्हणाले, आ.संतोष टारफे यांच्यावर सभेदरम्यान वापरलेली भाषा ही राजकीय वा टीकात्मक नसून खालच्या पातळीची आहे. जातीचाही जाणीवपूर्वक उल्लेख केल्याचे दिसत आहे. तर हे व्हॉटस्अ‍ॅपवर व्हायरल होत असून हे पाहूनही अनेकांनी बांगर यांचा निषेध केला.यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, बाबा नाईक, बापूराव बांगर, सुरेशअप्पा सराफ, शेख नईम शेख लाल, विनायक देशमुख, धनंजय पाटील, शिवाजी मस्के, रवि पाटील, माणिक करडिले, शिवाजी शिंदे, गजानन देशमुख, शासन कांबळे, विलास गोरे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदनही पोलीस अधीक्षक यांना दिले.पायाखालची वाळू सरकली-बांगरआ.संतोष टारफे यांच्या पायाखालची वाळू सरकली असून पक्ष व जनतेच्या दारातही तोंड दाखवायला जागा राहिली नाही. त्यामुळे ते आता जनतेची सहानुभूती लाटण्यासाठी अ‍ॅट्रॉसिटीचे हत्यार उपसून स्वत:च्या राजकीय पुनर्वसनासाठी माझ्या हद्दपारीची तयारी करीत असल्याचा आरोप सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी केला.

टॅग्स :PoliceपोलिसMLAआमदार