शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
6
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
7
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
8
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
9
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
10
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
11
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
12
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
13
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
14
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
15
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
16
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
17
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
18
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
20
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

रस्त्यावर उभ्या असलेल्या उसाच्या ट्राॅलीला दुचाकीची धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 15:33 IST

रात्रीच्या अंधारात रस्त्यावर उभी असलेली ट्रॉली न दिसल्याने ही धडक बसल्याची माहिती आहे.

कुरुंदा : वसमत तालुक्यातील कुरुंदा ते टोकाई रस्त्यावर शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास उसाच्या उभ्या ट्रॉलीला मोटरसायकलची धडक बसल्याने २८ वर्षीय एक तरुणाचा जागीच ठार झाला आहे. कुरुंदामार्गे कानोसा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील टाेकाई जवळ उसाची ट्राॅली उभी हाेती. या ट्राॅलीला माेटारसायकलवरील युवकाची रात्रीच्या अंधारात धडक बसली.

या भीषण अपघातात संतोष दत्तराव बारसे (वय २८ रा. कानोसा ता. वसमत) हा जागीच ठार झाला आहे. या मार्गावर मागील काही दिवसापासून अपघाताचे प्रमाणात वाढले आहे. तसेच या मार्गावर उसाचे ट्रॅक्टर, ट्राॅली बिघाड झाल्यास रस्त्यावर सोडुन देण्यात येत आहे. त्यामुळे रात्रीला उभ्या वाहनांना धडक बसून अपघात होण्याचे प्रकारही वाढले आहेत. यासंदर्भात संबंधित कारखानदारांनी व पाेलिसांनी अशाप्रकारे वाहन उभे करणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे.

टॅग्स :AccidentअपघातHingoliहिंगोली