शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

२२ बैल घेऊन जाणारा ट्रक पाठलाग करून पकडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 14:47 IST

बैलांचा ट्रक येत असल्याची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना व बाळापूर येथील नागरिकांना तसेच वारंगाफाटा येथील नागरिकांना देखील देण्यात आली.

हिंगोली: तब्बल २२ बैलांना ट्रकमध्ये कोंबून हिंगोलीकडून नांदेड जिल्ह्याच्या दिशेने जाणारा ट्रक नागरिकांनी व पोलिसांनी पाठलाग करून वारंगा फाटा येथे पकडला. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.१८ फेब्रुवारी रोजी हिंगोलीकडून नांदेडकडे एक ट्रक (क्र. एमएच ३५ के ५२९७) तब्बल २२ बैलांना कोंबून जात असल्याची माहिती कळमनुरी येथील नागरिकांना कळाली. त्यानुसार कळमनुरीहून त्या ट्रकचा पाठलाग नागरीक करत करत होते.

बैलांचा ट्रक येत असल्याची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना व बाळापूर येथील नागरिकांना तसेच वारंगाफाटा येथील नागरिकांना देखील देण्यात आली. सदरील ट्रक जरोडा येथील टोलनाक्यावर आडविण्याचा प्रयत्न केला. परंतु टोल नाक्यावरील वाहन अडविण्यासाठी असणारा पाईप तोडून भरधाव वेगाने तेथून तो प्रसार झाला. तो बाळापूरमध्येही आडविला गेला नाही. तेथून नागरिक व पोलिस वारंगा फाटाकडे त्या ट्रकचा पाठलाग करत आले.

वारंगा फाटा येथे नागरिकांना अगोदरच ही माहिती समजली. त्यामुळे नागरिकांनी वारंगा फाटा येथे महामार्गावर पहाटे सहा वाजेच्या सुमारास काही वाहने आडवी उभी करून तो ट्रक आडविला. त्यामध्ये एकूण २२ बैल कोंबल्याचे आढळून आले. बैलांसह ट्रक आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यामध्ये नेण्यात आली असल्याची माहिती फौजदार शिवाजी बोंडले यांनी दिली. त्या ट्रक चालकास नागरिकांनी जबर चोप दिल्याचे सांगितले.

टॅग्स :Hingoliहिंगोली