शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्यावरून संतापाचा सूर; गोरेगाव-जिंतूर मार्गावर शेतकऱ्यांनी जाळले टायर

By रमेश वाबळे | Updated: January 21, 2023 14:08 IST

शेतकऱ्यांचे चार दिवसांपासून सुरू आहे उपोषण

- दिलीप कावरखे गोरेगाव (जि.हिंगोली) : पीकविमासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी मागील चार दिवसांपासून गोरेगाव येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. २० जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या ताफ्याला काळेझेंडे दाखविण्यात आले होते. तर २१ जानेवारी रोजी सकाळी १० च्या सुमारास गोरेगाव ते जिंतूर मार्गावर टायर जाळून आंदोलक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

 यंदा अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खरीप हंगाम हातचा गेला असताना शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. पीकविमाच्या मागणीसाठी २३ डिसेंबर रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी पंधरा दिवसात पीकविमापोटी संरक्षीत रक्कमेसह १३.८९ कोटी परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, त्या आश्वासनाची अद्यसापही पूर्तता झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून संतापाचा सूर उमटत असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून  १३ जानेवारी रोजी सेनगाव येथील पीकविमा कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर १८ जानेवारीपासून गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे. २० जानेवारी रोजी हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तर यांच्या ताफ्याला सेनगाव- रिसोड मार्गावर काळेझेंडे दाखविण्यात आले होते. तर २१ जानेवारी रोजी गोरेगाव- जिंतूर मार्गावर टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकीने, वसमत तालुकाध्यक्ष बापुराव गरड, युवा तालुकाध्यक्ष ऋषिकेश बर्वे यांच्याकडून केल्या जात असलेल्या उपोषणाला जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या पाठिंबा मिळत आहे.

रविवारी बंदची हाक...आंदोलक शेतकऱ्यांच्या वतीने रविवारी (दि.२१ जानेवारी) गोरेगावसह हिंगोली व सेनगाव येथील बाजारपेठ बंदची हाक दिली आहे. यासंदर्भात पोलिस ठाण्यामार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. या बंदमध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाHingoliहिंगोलीFarmerशेतकरीagricultureशेती