शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

तपासासाठी हजार किमीचा प्रवास अन् ३ राज्यात धुमाकूळ घालणारी वाहन चोरांची टोळी जेरबंद

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: June 9, 2023 16:03 IST

हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या दोन दिवसांत एक हजार किमीचा प्रवास करून केला वाहन टोळीचा पर्दाफाश

हिंगोली : कर्नाटक, तेलंगाना व महाराष्ट्रात २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेला व पाच जिल्ह्यातील पोलिसांना हवा असलेला चोरटा हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला. त्यानंतर पथकाने आंतरराज्य वाहन टोळीचाच पर्दापाश केला. चारजण ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दहा लाखांचे दोन वाहने जप्त केली. 

हिंगोली तालुक्यातील लिंबाळा मक्ता भागातून ३ जून रोजी ट्रक चोरीला गेला होता. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी ट्रक चोरट्याच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने तपास सुरू केला. यातील ट्रक चोरटा सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर) भागात असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने खुर्शीद अहमद बशीर अहमद (वय ५० वर्षे,रा. चंद्रानगुट्टा पलकनुमा पॅलेस हैदराबाद) यास ताब्यात घेतले. त्यास विचारपूस केली असता त्याने ट्रक चोरल्याची कबुली दिली. तसेच हा ट्रक त्याचा मित्र आरेफ अहमद शेख (रा. आळंद ता. फुलंब्री) यास विकल्याचे सांगितले. पोलिसांनी आरेफ शेख यास ताब्यात घेतले असता त्याने हा ट्रक त्याचा मित्र रोमान उर्फ शेख शाहेद अख्तर शेख रफीक (रा.रेंगटीपुरा छत्रपती संभाजीनगर), अझर अकबर शेख (गारखेड परिसर छत्रपती संभाजीनगर) यांच्या मार्फत शे.शाहेद शे.वाहेद (रा. धाराशीव) याला विकल्याचे सांगितले. पथकाने ट्रक जप्त केला. तसेच यातील तिघांनी महागाव (जि. यवतमाळ) पोलिस ठाणे हद्दीतील गुंज येथून १ कार चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी यातील चार जणांना ताब्यात घेतले. आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

जळगाव कारागृहातून सुटला अन् पुन्हा चोरीयातील खुर्शीद अहमद बशीर अहमद हा वाहन चोरीचा आंतरराज्य गुन्हेगार असून तो काही दिवसांपूर्वीच जळगाव कारागृहातून सुटल्याची माहिती आहे. तसेच त्याच्यावर कर्नाटक, तेलंगाना व महाराष्ट्र या तिन्ही राज्यात एकूण २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील पोलिस त्याचा शोध घेत होती. हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळीचा पर्दापाश केला. 

दोन दिवसांत एक हजार किमीचा प्रवासहिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या दोन दिवसांत एक हजार किमीचा प्रवास करून दरोडा,चोरी,जबरी चोरी,वाहन चोरी सारख्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पकडले. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार गजानन पोकळे, किशोर कातकडे, लिंबाजी व्हावळे, विठ्ठल काळे, ज्ञानेश्वर पायघन, हरिभाऊ गुंजकर, प्रमोद थोरात यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली