शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

गोड बोलून शेजारील प्रवाशाने फसवलं; क्रीम बिस्कीट देऊन बेशुध्द करत अंगठी चोरली

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: August 9, 2023 17:55 IST

क्रीम बिस्किटमधून गुंगीकारक द्रव्य देवून प्रवाशाची अंगठी घेतली काढून 

हिंगोली : क्रीम बिस्किट व पाण्यामध्ये गुंगीकारक द्रव्य देवून बेशुद्ध केलेल्या भामट्याने एका प्रवाशाच्या हातातील १० ग्रॅम वजनाची ४० हजार रूपये किमतीची अंगठी काढून घेतली. हा प्रकार हिंगोली ते शेंबाळपिंपरी प्रवासात एसटीमध्ये ६ ऑगस्ट रोजी घडला. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात ८ ऑगस्ट रोजी रात्री गुन्हा नोंद झाला.

परभणी जिल्ह्यातील मानवत येथील मधूकरराव दहे हे ६ ऑगस्ट रोजी एमएच १३ सीयु ७४९५ या क्रमांकाच्या अंबेजोगाई ते नागपूर एसटी बसने प्रवास करण्यासाठी बसमध्ये बसले. हिंगोली बसस्थानकातून बस पुढच्या प्रवासाला निघाली. प्रवासादरम्यान एका भामट्या प्रवाशाने दहे यांच्याशी हितगुज साधून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रवासात त्याने दहे यांना क्रिम बिस्किट खायला दिला. 

तसेच पाणीही पिण्यासाठी दिले. मात्र काही वेळातच त्यांना गुंगी येऊन ते बेशुद्ध झाले. या संधीचा फायदा घेत भामट्याने दहे यांच्या हातातील ४० हजार रूपये किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढून घेतली. बस डिग्रस येथे पोहचल्यानंतर हा प्रकार समोर आला. ही माहिती दहे यांनी मुलगा विक्रमसिंह दहे यांना दिली.  या प्रकरणी विक्रमसिंह दहे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात भामट्याविरूद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. मानवी शरीरास अपायकारक असलेले कोणतेतरी गुंगीकारक द्रव्य क्रीम बिस्किट व पाण्यामधून दिले. तसेच हातातील सोन्याची अंगठी काढून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिस अंमलदार संजय मार्के तपास करीत आहेत. 

एसटी प्रवासात लुबाडण्याचे प्रकार वाढलेहिंगोली बसस्थानकातून या पूर्वी महिलांच्या गळ्यातील सोन्याची दागिणे, प्रवाशांचे मोबाईल, पैशाचे पाकिट चोरट्यांनी पळविल्याच्या घटना घडल्या आहेत. आता प्रवासात एखाद्या प्रवाशाचा विश्वास संपादन करून त्याचे पैसे, दागिणे काढून घेण्याचे प्रकार वाढले आहेत. दोन दिवसांपूर्वी कळमनुरी येथे बसमध्ये चढत असताना एका प्रवाशाच्या खिशातील पैसे काढून घेतल्याचा प्रकारही समोर आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली