शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi Honoured With Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
2
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
3
सोनं झालं 'लखपती', Gold-Silver चे दर गगनाला भिडले; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवी किंमत
4
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
5
ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मिळेल ६०,००० पेक्षा जास्त पेन्शन, 'या' योजनेत करा गुंतवणूक
6
"घाबरत नाही...", अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर रवीना टंडनचा एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास, म्हणते...
7
Donald Trump: ...तर अमेरिकी फौजा तुटून पडतील; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा!
8
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...
9
Israel Iran Conflict : इस्त्रायली हल्ल्यात इराणमध्ये दोन भारतीय विद्यार्थी जखमी; भारताने परत आणण्याची तयारी केली, या मार्गाने आणले जाणार
10
MI6 ला पहिल्यांदाच मिळाली महिला 'चीफ', कोण आहेत गुप्तचर प्रमुख ब्लेझ मेट्रेवेली? जाणून घ्या
11
Women’s World Cup 2025 : ठरलं! या दिवशी रंगणार भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना
12
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
13
७२ तासांच्या युद्धात भीषण विध्वंस! ४०६ इराणींचा मृत्यू, इस्रायलचे किती नुकसान? जाणून घ्या...
14
"इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा", काँग्रेसची मागणी
15
VIDEO : 'मी घरीच आहे अन्...', लाइव्ह कॅमेरॅवरच डेल स्टेनला रडू कोसळलं; नेमकं काय घडलं?
16
शूटिंगसाठी निघालेल्या मॉडेलची निर्घृण हत्या;मृतदेह कालव्यात फेकला, टॅटूवरून पटली ओळख
17
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
18
Pune Bridge Collapse: पुलाखाली अडकलेल्यांना काढले; पुलाचा सांगाडा काढण्यास चार क्रेन
19
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
20
इराणने थेट अमेरिकन दूतावासावर डागली मिसाइल्स, इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये घबराट

मोठी बातमी! १ कोटी रुपयांच्या बनावट नोटांसह ९ जण पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 18:09 IST

औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालय परिसरातून पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले

औंढा नागनाथ (हिंगोली): पेट्रोलिंग दरम्यान ग्रामीण रुग्णालय परिसरात बुधवारी रात्री पोलिसांनी काही संशयिताना ताब्यात घेतले. अधिक माहिती घेतली असता सर्वजण बनावट नोटा पसरवणारी टोळीतील असल्याचे उघडकीस झाले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत ९ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून १ कोटी १४ लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. 

औंढा नागनाथ येथील पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे हे कर्मचाऱ्यांसह बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास शहरांमध्ये पेट्रोलिंग करत होते. यावेळी ग्रामीण रुग्णालयाजवळ रस्त्याच्याकडेल एका गाडीजवळ एक महिला व सहा जण आपसात वाद करीत होते. संशयावरून पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता त्यात ३९ लाख रुपये आढळून आले. संशयितांनी यावर उडवाउडवीची उत्तरे दिली. 

परंतु, एका महिलेने १२ लाख ५० हजार घेऊन 39 लाख रुपयाच्या बनावट नोटा देऊन काहीजण चारचाकीने पसार झाल्याने सांगितले. झुंजारे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गाडीचा पाठलाग करून खामगाव येथून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडूनही 75 लाख रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या. अशा एकूण १ कोटी १५ लाख रुपयांच्या बनावट नोटांसह ९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे, पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड, दत्ता ठोंबरे, प्रकाश आवडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अफसर पठाण, जमादार संदीप टाक, माधव सूर्यवंशी, ज्ञानेश्वर गोरे, अमोल चव्हाण, सचिन मस्के ,वसीम पठाण, विलास पाईकराव, मदतनीस राहुल मोगले यांच्या पथकाने केली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली