शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

८७५ मुख्याध्यापकांचे मानधन रखडलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:42 IST

शालेय पोषण आहार योजनेचे जमा खर्च यासह इतर लेखाजोखा लिहण्यासाठी मुख्याध्यापकांना महिन्याला १०० रूपये तर वार्षिक १ हजार रूपये दिले जातात. परंतु मागील दोन वर्षांपासून ही रक्कम मुख्याध्यापकांच्या हाती पडली नाही. ३१ मार्च रोजीच एसबीआय बँककडे धनादेश देऊनही ही रक्कम अद्याप ८७५ मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा झाली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शालेय पोषण आहार योजनेचे जमा खर्च यासह इतर लेखाजोखा लिहण्यासाठी मुख्याध्यापकांना महिन्याला १०० रूपये तर वार्षिक १ हजार रूपये दिले जातात. परंतु मागील दोन वर्षांपासून ही रक्कम मुख्याध्यापकांच्या हाती पडली नाही. ३१ मार्च रोजीच एसबीआय बँककडे धनादेश देऊनही ही रक्कम अद्याप ८७५ मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा झाली नाही.शालेय पोषण आहार योजनेच्या रेकॉर्डची कामे करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर आहे. या कामासाठी मुख्याध्यापकांना दरमहा शंभर रुपए याप्रमाणे वषार्काठी १ हजार रुपए मानधन दिले जाते. परंतु मागील दोन वर्षांपासून मुख्याध्यापकांच्या खात्यावर मानधनच जमाच झाले नाही. जिल्ह्यात शालेय पोषण आहार योजनेच्या कामात अनियमता हा नेहमीचाच विषय आहे. जिल्हाभरात जि. प. च्या शाळांमध्ये जवळपास ८०० च्यावर मुख्याध्यापक कार्यरत आहेत. या सर्व शाळेमध्ये शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. सदर योजनेची लेखा-जोखा ठेवण्याच्या कामाची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर आहे. शासनाकडून उपलब्ध झालेला तांदूळ, धान्यादी माल व इतर माहितीचे रेकॉर्डची कामे मुख्याध्यापक करतात. सदर कामासाठी मुख्याध्यापकांना दरमहा १०० रुपये म्हणजेच वार्षिक १ हजार रुपये मानधन दिले जाते. परंतु शासनाकडून निधी उपलब्ध होऊनही अद्याप एकाच्याही खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली नाही.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष जिरवणकर व जि. प. सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी शिक्षण विभागाकडे हा प्रश्न वारंवार मांडला. त्यानंतर विभागीय आयुक्त शिक्षण उपसंचालक औरंगाबाद, शिक्षण संचालक (पुणे) यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनही दिले. शिक्षण विभागातील शालेय पोषण आहार विभागाकडे तर याबाबत कधीच माहिती उपलब्ध नसते. संबंधित कर्मचारी अधिकाऱ्याकडेच माहितीचे रेकॉर्ड असते, असे सांगत हात झटकतात. मानधन खात्यावर जमा केले जात नसल्यामुळे विविध शाळांतील मुख्याध्यापक सोमवारी बँकेला जाब विचारणार आहेत.पाच महिन्यांपासून बँकेत धनादेश पडून...भारतीय स्टेट बँकेत मुख्यध्यापकांच्या २०१७-१८ मधील मानधनासाठी धनादेश ३१ मार्च २०१८ रोजीच बँकेत जमा करण्यात आला आहे.पंरतु बँकेने अद्याप मुख्याध्यापकांच्या खात्यावर शासनाकडून मिळालेली मानधनाची रक्कम वर्ग केली नाही. त्यामुळे याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. धनादेश देऊनही खात्यावर रक्कम वर्ग होत नसल्याचे कारण हा शोधाचा विषय आहे. मागील दोन वर्षांपासून मानधन मिळत नसल्याची मुख्याध्यापकांची तक्रार आहे. याबाबत विविध शाळांतील मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकाºयांकडे धाव घेत अनेकदा मानधनाची मागणीही केली होती.

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षक