रोहयोच्या कामांवर ८ हजार मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 01:00 AM2019-01-10T01:00:39+5:302019-01-10T01:00:56+5:30

मग्रारोहयोच्या कामांवर मजूर उपस्थिती वाढत असून दररोज ८ हजारांवर मजूर उपस्थित राहात आहेत. साप्ताहिक मजूर उपस्थितीचा आकडा ४९ हजारांच्या घरात गेला आहे. दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे मजूर या कामांवर येताना दिसत आहेत.

 8 thousand laborers of Roho's work | रोहयोच्या कामांवर ८ हजार मजूर

रोहयोच्या कामांवर ८ हजार मजूर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मग्रारोहयोच्या कामांवर मजूर उपस्थिती वाढत असून दररोज ८ हजारांवर मजूर उपस्थित राहात आहेत. साप्ताहिक मजूर उपस्थितीचा आकडा ४९ हजारांच्या घरात गेला आहे. दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे मजूर या कामांवर येताना दिसत आहेत.
हिंगोली जिल्ह्यात यंदा अल्पपर्जन्यामुळे रबीचा हंगाम नसल्यातच जमा आहे. काही भाग वगळता बहुतांश भागात रबीची पिके दिसण्याइतकीही नाहीत. त्यामुळे अशा भागांमध्ये रोहयोच्या कामांशिवाय कोणताच पर्याय शिल्लक नाही. त्यामुळे रोहयोच्या कामांवर मजूर येताना दिसत आहेत. औंढा वगळता इतर सर्वच तालुक्यांमध्ये हजारो मजूर रोहयोच्या कामांवर येत असल्याचे चित्र आहे. यामध्ये ग्रामपंचायतींची एकूण ७0६ तर यंत्रणांची २७३ कामे सुरू आहेत. ग्रामपंचायतींच्या कामांवर ४३ हजार २५२ तर यंत्रणांच्या कामांवर ६३१२ मजुरांची साप्ताहिक उपस्थिती आहे.
यंत्रणा व ग्रामपंचायतींची मिळून सुरू असलेली कामे व साप्ताहिक मजूर उपस्थिती पुढीलप्रमाणे आहे. यामध्ये हिंगोली १५५ कामांवर ८ हजार ४२८ मजूर, कळमनुरीत १५८ कामांवर ९ हजार ११४ मजूर, सेनगावात ३0९ कामांवर २0 हजार ४२४ मजूर, वसमत तालुक्यात २७४ कामांवर ९ हजार ६४६ मजूर, औंढा तालुक्यात ८३ कामांवर १९५२ मजूर आहेत.
मागील काही दिवसांत मजुरांचे प्रमाण वाढू लागल्याने ग्रामपंचायती ही कामे सुरू करण्यास पुढाकार घेताना दिसत आहेत. अनेक ग्रामपंचायतींमध्ये मात्र अजूनही कामे सुरू करण्यास टाळाटाळ कायम असल्याचे चित्रही पहायला मिळते.
दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने शेल्फवर तब्बल ५४८८ कामे ठेवली आहेत. यामध्ये हिंगोलीत १0८४, कळनुरीत १३३१, सेनगावात १९४१, वसमतला ५६८, औंढा नागनाथला ५६४ कामे आहेत. या कामांवर ११ लाख मजुरांना काम उपलब्ध करून देणे शक्य आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये एवढी कामे पुरेशी असून गरज पडल्यास आणखी वाढविणे शक्य आहे. त्यामुळे ज्या भागात मजुरांच्या हाताला काम नाही, अशांनी ग्रामपंचायतींकडे कामाची मागणी केल्यास तात्काळ काम उपलब्ध करून देणे शक्य असल्याचे रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी यांनी सांगितले.

Web Title:  8 thousand laborers of Roho's work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.