शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अंगावर ऑईल फेकून शेतकऱ्याचे ७८ हजार पळवले, हळद विक्रीतून मिळाली होती रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 17:54 IST

काही कळायच्या आत दोन्ही चोरटे रक्कम घेऊन दुचाकीवरून पसार झाले.

- इस्माईल जहागिरदारवसमत: अंगावर अॉईल फेकून ६६ वर्षीय शेतकऱ्याचे ७८ हजार ५०० रुपये पळवल्याची घटना शहरातील महाविर चौकात आज दुपारी घडली. चोरट्यांनी दुचाकीवरून सिनेस्टाईल पसार झाले. ही घटना शहर पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर घडली. 

वसमत तालुक्यातील सातेफळ येथील शेतकरी नंदु स्वामी यांनी आज दुपारी बॅंकेतून ७८ हजार ५०० रुपये रक्कम काढली. दुपारी १ वाजेच्या सुमारास रक्कम घेऊन ते चालतच महाविर चौकाकडे निघाले. दरम्यान, पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघांनी त्यांच्या अंगावर अॉईल फेकले. अंगावर काय पडले हे पाहत स्वामी थांबले. ऑइल पुसत असतानाच दुचाकीवरील दोघांनी स्वामी यांना पकडून त्यांच्याकडील संपूर्ण रक्कम पळवली. 

काही कळायच्या आत दोन्ही चोरटे ७८ हजार ५०० रुपयांची रक्कम घेऊन दुचाकीवरून पसार झाले. स्वामी यांनी लागलीच शहर पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोनि चंद्रशेखर कदम, जमादार शेख हकीम, शेख नय्यर,कृष्णा चव्हाण यांच्यासह पोलीस पथक चोरट्यांचा शोध घेत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली