शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

कर्जमाफीचे ७७00 लाभार्थी शिल्लकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:15 IST

कर्जमाफीचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत मिळाला पाहिजे, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर अर्ज करण्यास वारंवार मुदतवाढ मिळत आहे. २६७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे सांगितले जात असले तरीही बोंब कायम असून ७७00 जणांच्या खात्यावरच अजून रक्कम पोहोचली नाही.

विजय पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कर्जमाफीचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत मिळाला पाहिजे, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर अर्ज करण्यास वारंवार मुदतवाढ मिळत आहे. २६७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे सांगितले जात असले तरीही बोंब कायम असून ७७00 जणांच्या खात्यावरच अजून रक्कम पोहोचली नाही.हिंगोली जिल्ह्यात कर्जमाफीच्या योजनेत अर्ज करूनही अनेकांना मागील दोन वर्षांपासून त्याचा लाभ मिळाला नसल्याची बोंब आहे. तर काहींनी जुने अर्जच वाया गेल्याने नव्याने अर्ज केलेले आहेत. ३0 जून २0१८ पर्यंत या योजनेत ६६ हजार ३३९ शेतकऱ्यांना २६0 कोेटींची कर्जमाफी झाल्याचे सांतिले जात होते. तर त्यावेळी ६0 हजार ९२२ शेतकºयांच्या खात्यावर २३९ कोटी रुपये जमा झाले होते. तर २ हजार १४५ शेतकºयांचे १६ कोटी २२ लाख रुपये खात्यावर जमा होणे बाकी होते.यानंतर मध्येच शासनाने कुटुंबातील प्रत्येक पात्र सदस्याला दीड लाखांच्या मर्यादेत कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे पूर्वी ज्यांनी अर्ज केले नाही, अशांना नव्याने आस लागली होती. १0 आॅगस्ट २0१८ चा हा निर्णय होता. मात्र त्याचे अर्ज कधी व कसे करायचे, याची काहीच माहिती नव्हती. नंतर यात माहिती संकलित करण्यासाठीही सूचना न आल्याने बराच काळ हा आदेश बस्त्यात होता. मात्र शेतकºयांना अर्ज करण्यास मुदतवाढ दिल्यानंतर ६६ हजारांवरून लाभार्थीसंख्या ७३ हजारांवर गेली. तर कर्जमाफीचा लाभ २६२ कोटींवरून ३२७ कोटींवर गेला आहे. मात्र प्रत्यक्षात ७७00 शेतकºयांच्या खात्यावर रक्कमच जमा होणे बाकी आहे. अजूनही हे काम धिम्या गतीने सुरू आहे. शेतकºयांना बँक खात्यावर रक्कम जमा झाली की नाही, याची माहिती मिळायची काहीच सोय नाही. मुंबईतून हा कारभार चालतो. त्यामुळे स्थानिक अधिकारी हैराण आहेत. बºयाच जणांनी तर या कर्जमाफीची आशा सोडली आहे. तर दुसरीकडे ७३ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ दिल्याचे सांगितले जात असल्याने नेमके घोडे कुठे पेंड खातेय? हे कळायला मार्ग नाही. अशा यंत्रणेची गरज आहे.पूर्वीच्या ६६ हजार लाभार्थ्यांहून आता ७३ हजारांवर लाभार्थीसंख्या गेली. यामये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २४ हजार २३३ जणांना ३0.0८ कोटींची कर्जमाफी झाली. २0 हजार ८५२ जणांना २५ कोटींचा लाभ मिळाला. ३३८१ जण शिल्लक आहेत. राष्ट्रीयकृत बँकांत ३९१११ जणांना २४0 कोटींची कर्जमाफी झाली. ३७६३९ जणांच्या खात्यावर २0३ कोटी गेले. १४७२ जणांचे ३७ कोटी शिल्लक आहेत. तर ग्रामीण बँकेत १0३३२ जणांना ५७.२२ कोटींची कर्जमाफी झाली. ७४८५ जणांच्या खात्यावर ३९.३९ कोटी गेली. २८४७ जण शिल्लक आहेत.कर्जमाफीतील ७७00 जणांच्या कर्जमाफीचा प्रश्न अजूनही विविध कारणांनी प्रलंबित आहे. या लाभार्थ्यांना ५९.९९ कोटींचा लाभ मिळणार आहे. रक्कम खात्यावर कधी येणार? हा प्रश्न आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी