शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

६५०० सावित्रीच्या लेकींना मिळणार शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:34 IST

जिल्ह्यातील ६५०० विद्यार्थिनींच्या बँक खात्यावर सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे. शिष्यवृत्ती योजनेच्या लाभासाठी शासनाकडून ५० लाखांच्या निधीस मंजूरी मिळाल्याची माहिती जि. प. समाज कल्याण विभागाने दिली. त्यामुळे २०१७-१८ मधील सावित्रीच्या लेकींना येत्या दहा दिवसांत लाभ मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील ६५०० विद्यार्थिनींच्या बँक खात्यावर सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे. शिष्यवृत्ती योजनेच्या लाभासाठी शासनाकडून ५० लाखांच्या निधीस मंजूरी मिळाल्याची माहिती जि. प. समाज कल्याण विभागाने दिली. त्यामुळे २०१७-१८ मधील सावित्रीच्या लेकींना येत्या दहा दिवसांत लाभ मिळणार आहे.शाळेतील मागासवर्गीय मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे, व पालकांनीही त्यांना नियमित शाळेत पाठवावे हा उद्देश समोर ठेवत शासनाकडून जि. प. समाजकल्याण तर्फे मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून अर्थसहाय्य केले जाते. सदर योजनेत हिंगोली जिल्ह्यातील ६५०० विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.मार्च एण्डींगच्या बँकेतील कामांमुळे विद्यार्थिनींच्या बँक खात्यावर रक्कम वर्ग करण्यास विलंब झाला. परंतु येत्या दहा दिवसांत शिष्यवृर्त्ती रक्कम विद्यार्थिनींच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. तर शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मधील शिष्यवृत्ती योजना यामध्ये सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, मेट्रीकपूर्व, अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केल्याची माहिती समाज कल्याण विभागाने दिली. तसेच काही बँकेत सदर शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्याची प्रक्रीया सुरू आहे. बँकेतील मार्चएण्डची कामे आटोपताच उर्वरीत विद्यार्थ्यांच्याही खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जाईल. शासनाकडून १ कोटी ५ लाख रूपये समाज कल्याण तर्फे बँकेत वर्ग करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रीया सुरूच आहे.२०१७-१८ या वर्षामध्ये सावित्रीबाई फुले शिष्यवृती योजनेतंर्गत ५ वी ते ७ वी विद्यार्थिनींना दरमहा ६० रूपयांप्रमाणे दहा महिन्यांचे ६०० रूपये तर अनुसूचित जातीमधील ८ वी ते १० वीत शिक्षण घेणाºया मुलींना दरमहा १०० रूपये याप्रमाणे १ हजार रूपये, शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो.२०१७-१८ मधील सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजनेच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. मेट्रीकपूर्व व अस्वच्छ व्यवसाय करणाºया पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती योजनेस शासनाकडून अद्याप निधी मिळाला नाही.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदSchoolशाळा