शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

ग्रा.पं.चे ६२ हजार लेखाआक्षेप प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:38 IST

विविध कारणांनी आर्थिक व प्रशासकीय बाबींमध्ये त्रुटी ठेवल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे ६२ हजार ५१ लेखाआक्षेप समोर आलेले आहेत. यापैकी ४३९१ आक्षेप अजूनही प्रलंबित आहेत. या लेखाआक्षेपांच्या वारुळात भ्रष्टाचाराचा सापही दडलेला असू शकतो. त्यामुळे निकाली निघण्याचे प्रमाण कमी दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : विविध कारणांनी आर्थिक व प्रशासकीय बाबींमध्ये त्रुटी ठेवल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे ६२ हजार ५१ लेखाआक्षेप समोर आलेले आहेत. यापैकी ४३९१ आक्षेप अजूनही प्रलंबित आहेत. या लेखाआक्षेपांच्या वारुळात भ्रष्टाचाराचा सापही दडलेला असू शकतो. त्यामुळे निकाली निघण्याचे प्रमाण कमी दिसत आहे.आर्थिक व प्रशासकीय नियमितता कायम राहण्यासाठी सर्वच यंत्रणांचे लेखा परिक्षण विविध स्तरावर करण्यात येते. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचेही लेखा परिक्षण केले जाते. ग्रामपंचायतींच्या ५६ हजार लेखा आक्षेपांची पूर्तता करण्याचे उद्दिष्ट मार्च २0१८ ला देण्यात आले होते. यात हिंगोली-९१३४, कळमनुरी १२२२५, वसमत-१९५१५, औंढा नागनाथ ३५५१, सेनगाव-११७८८ अशी पंचायत समितीनिहाय आक्षेपांची संख्या आहे. त्यात नोव्हेंबर २0१८ मध्ये दिलेल्या १0१९९ लेखाआक्षेपांची भर पडली आहे. त्यामुळे आकडा ६६ हजारांवर पोहोचला. मात्र ४३९१ आक्षेप निकाली निघाले. त्यामुळे यातील आर्थिक व्यवहाराबाबत असलेले किती याचा नेमका आकडा सांगणे अवघड आहे. मात्र अनेक आक्षेप तसेही असू शकतात. मात्र या आक्षेपांकडे गांभिर्यानेच पाहिले जात नसल्याने आर्थिक अनियमिततेकडेही पाठ फिरविली जाते. त्यात नंतर अनेक ठिकाणी तक्रारी झाल्यावर हे मुद्दे आक्षेपातही असल्याचे समोर येते. मात्र त्यानंतर अशा ग्रामपंचायतींत चौकशी, तक्रारी अशा भानगडी कायम सुरू राहतात. त्या टाळण्यासाठी वेळेत आक्षेप निकाली निघणे तेवढेच महत्त्वाचे असते. मात्र याकडे दुर्लक्ष होण्यामागे न उलगडणारे कोडे आहे. जिल्ह्यातील ५६३ ग्रामपंचायतींत एकूण ६२ हजार आक्षेप प्रलंबित आहेत. यात सरासरी काढली तर प्रत्येक ग्रा.पं.त शंभरावर आक्षेप प्रलंबित आहेत. त्यामुळे हा गंभीर प्रकार आहे.गटविकास अधिकाऱ्यांनी विस्तार अधिकाºयांमार्फत सर्वसाधारण ६५ व सखोल १५ अशा किमान ८0 ग्रामपंचायती वर्षभरातून तपासणे अनिवार्य आहे. हिंगोली जिल्ह्यातील पाचही पंचायत समित्यांच्या प्रमुखांनी यात दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात १५ विस्तार अधिकारी पंचायत विभागाचा कारभार सांभाळतात. त्यातील केवळ एका विस्तार अधिकाºयाने एक ग्रा.पं. तपासल्याचे कळमनुरीच्या अहवालात म्हटले आहे. तर इतरांनी मात्र तपासणीचा कोणताच अहवाल दिलेला नाही. यावरून या उद्दिष्टाला हरताळच दिसत आहे.पंचायत समितीकडून ग्रामपंचायतींची तपासणीच होणार नसेल तर लेखाआक्षेपांसारख्या गंभीरमुद्यांवर सरपंच व ग्रामसेवक मंडळीही किती गांभिर्य दाखवेल, हा वादाचाच मुद्दा आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतEconomyअर्थव्यवस्था