शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ओळखपत्र न मिळाल्याने ५४ विद्यार्थी नवोदय परीक्षेपासून वंचित;पालकांतून संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 14:09 IST

या विद्यालयातील ५४ विद्यार्थ्यांचे परीक्षा फार्म सबमीट न झाल्याने त्यांचे आॅनलाईन ओळखपत्र आलेच नाहीत.

ठळक मुद्दे दोषीं मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई केली जाईल.

कळमनुरी (जि. हिंगोली) : जिल्ह्यातील विविध केंद्रावरून ११ जानेवारी रोजी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणीची परीक्षा घेण्यात येत आहे. परंतु कळमनुरी येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील ५४ विद्यार्थ्यांचे ऑलनाईन ओळखपत्रच आले नाही. त्यामुळे या ५४ विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास नकार दिल्याने विद्यार्थी आणि पालकांतून संताप व्यक्त केला जात आहे.  

शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभार आता परत एकदा चव्हाट्यावर आला आहे. कळमनुरी येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील ५४ विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. या विद्यालयातील ५४ विद्यार्थ्यांचे परीक्षा फार्म सबमीट न झाल्याने त्यांचे आॅनलाईन ओळखपत्र आलेच नाहीत. त्यामुळे संबंधित मुख्याध्यापकाने ओळखपत्र तयार केले, त्यानंतर विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जेव्हा हे ओळखपत्र सकाळी १० ते १०.३० वाजता घेऊन आले व बैठक क्रमांक शोधत होते. परंतु आॅनलाई फॉर्मच सबमीट न झाल्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकाच आली नसल्याचे समोर आले. यावेळी एकच गोंधळ उडाला होता, विद्यार्थी आणि पालकांतून संताप व्यक्त केला जात होता.  

गट शिक्षणाधिकारी म्हणतात...याबाबत कळमनुरीचे तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी राजेश पातळे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, ही शाळेची चूक आहे. या विद्यार्थ्यांचे फार्म सबमीट न झाल्याने त्यांचे आॅनलाईन ओळखपत्र आले नाहीत. यात दोषीं मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई केली जाईल. 

टॅग्स :Studentविद्यार्थीhingna-acहिंगणाSchoolशाळा