शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

किसान सन्मान योजनेच्या बोगस लाभार्थ्यांकडून वसुलीपात्र ५.३० कोटी, वसूल १४ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 18:18 IST

किसान सन्मान योजनेत बनावट लाभार्थ्यांचा शिरकाव

ठळक मुद्देकिसान सन्मान निधी योजनेत झालेले गौडबंगाल

हिंगोली : प्रधानमंत्री किसान  सन्मान निधी योजनेअंतर्गत शासनाकडून जिल्ह्यातील २ लाख ९ हजार ४२८ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात दर चार महिन्यांनी २ हजार रुपये जमा केले जातात. त्यात ७ हजार ४३० शेतकरी लाभार्थी बनावट असल्याची बाब निष्पन्न झाली असून संबंधितांकडून ५ कोटी ३० लाख २६ हजार रुपये वसूल करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यापैकी केवळ १४ हजार रुपये वसूल झाले आहेत. 

शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंमलात आणली. याअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील २ लाख ९ हजार ४२८ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात दर चार महिन्यांनी २ हजार रुपये याप्रमाणे वर्षाकाठी ६ हजार रुपयांचा निधी जमा करण्यात येत आहे. या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आतापर्यंत खर्च झाला आहे.  दरम्यान, स्वत:ची खोटी माहिती सादर करून तथा काही मयत झालेल्या शेतकऱ्यांची नावे पुढे करून तसेच करदाते असतानाही ७ हजार ४३० शेतकऱ्यांनी आतापर्यंत ५ कोटी ३० लाख २६ हजारांचा मोठा  निधी हडपल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थींंकडून विनाविलंब रक्कम वसूल करण्याचे आदेश शासन स्तरावरून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्याची दखल घेत प्रशासन कामाला लागले; मात्र २ नोव्हेंबरपर्यंत केवळ वसमत आणि कळमनुरी येथील २ शेतकऱ्यांकडून १४ हजारांची रक्कम वसूल करण्यात आली. उर्वरित ७ हजार ४२८ शेतकऱ्यांनी चुकीने हडपलेली रक्कम वसूल करण्याचे आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे 

2,09,428 शेतकऱ्यांच्या खात्यात दर चार महिन्यांनी जमा होते रक्कम7,430 बनावट लाभार्थ्यांना परत करावे लागणार ५ कोटी ३० लाख02 शेतकऱ्यांनी आतापर्यंत परत केले १४ हजार रूपये

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत हिंगोली जिल्ह्यातील एकूण २ लाख ९ हजार ४२८ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दर चार महिन्यांनी २ हजार रूपये याप्रमाणे रक्कम जमा केली जात आहे. त्यातीलच ७ हजार ४३० लाभार्थी बनावट असल्याचे चौकशीत आढळले आहे. संबंधितांकडून रक्कम वसुलीची कार्यवाही गतीने सुरू करण्यात आली आहे.      -  चंद्रकांत सूर्यवंशी, आरडीसी 

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरीfundsनिधी