शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

हिंगोली जिल्ह्यात ५ जण गेले पुरात वाहून; दोघे सापडले, तिघांचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 7:41 PM

rain in hingoli : धबधबा पाहण्यासाठी हिंगोलीतील काही मित्र शनिवारी दुपारच्या सुमारास गेले होते.

हिंगोली : पारोळा शिवारातील तलावाच्या सांडव्यावरून हिंगोली शहरातील तिघे मित्र वाहून गेल्याची घटना २५ सप्टेंबर रोजी घडली. यातील दोघांचा शोध घेण्यात यश आले असून ते सुखरूप आहेत. तर वाहून गेलेल्या एकाचा शोध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक घेत आहे.

जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. शनिवारीही सकाळपासूनच सर्वदूर पाऊस कोसळत होता. यामुळे नदी, ओढ्यांना पूर आला होता. शेतातील पिकेही पाण्याखाली गेली असून मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील नदी, ओढ्यांना आलेल्या पुराच्या पाण्यात ५ जण वाहून गेले. हिंगोली तालुक्यातील पारोळा परिसरात शनिवारी झालेल्या पावसामुळे येथील तलावही भरला. सांडव्यावरून खाली पडणाऱ्या पाण्याला धबधब्याचे स्वरूप आले आहे. 

हा धबधबा पाहण्यासाठी हिंगोलीतील काही मित्र शनिवारी दुपारच्या सुमारास गेले होते. यावेळी यातील कुणाल बंडू खंदारे (वय २० रा. गणेशवाडी, हिंगोली) याचा पाय घसरून तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जात होता. त्याला वाचविण्यासाठी शिवम कैलास खंदारे (वय १९) व सचिन मधूकर शिंदे (वय २०) यांनी पाण्यात उड्या घेतल्या. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तिघेही वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीणचे पोलीस निरक्षक मळघणे, बीट जमादार संतोष वाठोरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांच्या मदतीने पथकाने वाहून गेलेल्या तरूणांचा शोध सुरू केला. यावेळी यातील शिवम कैलास खंदारे व सचिन मधूकर शिंदे हे दोघे काही अंतरावर सापडले. दोघेही सुखरूप असून कुणाल खंदारे याचा पोलीस शोध घेत आहेत.

मन्नास पिंपरी, साखरा तांडा येथील दोघांचा शोध सुरूसेनगाव तालुक्यातील मन्नास पिंपरी व साखरा तांडा परिसरातही शनिवारी सकाळपासून जोरदार पाऊस झाला. त्यामुळे ओढ्यांना पूर आला होता. यात मन्नास पिंपरी जवळील आलेल्या ओढ्याच्या पुरात संतोष कोंडूजी गायकवाड (रा. हिवरा गायकवाड) हे वाहून गेले. ते मन्नास पिंपरी येथे आले होते. गावाकडे परत जात असताना ही घटना घडली. तर साखरा तांडा शिवारातील ओढ्याला आलेल्या पुरात ४५ वर्षीय मुकबधीर व भोळसर महिला सावित्रीबाई थावरा चव्हाण (रा. साखरा तांडा) असे वाहून गेलेल्या महिलेचे नाव आहे. दोघांचाही शोध सुरू आहे.

टॅग्स :floodपूरHingoliहिंगोलीRainपाऊस