शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

४१ टक्के बालकेच कुपोषणातून बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 23:40 IST

जिल्ह्यात बालग्रामविकास केंद्रांमध्ये दाखल करण्यात आलेल्या बालकांपैकी ४१ टक्के बालकेच सर्वसाधारण श्रेणीत आले आहेत. तर ४ बालकांनी हे केंद्रच सोडल्याने पुन्हा त्याच श्रेणीत राहिल्याचे दिसून येत आहे. तर आॅक्टोबरअखेर जिल्ह्यात तीव्र कमी वजनाची १४२९ बालके असल्याचे आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात बालग्रामविकास केंद्रांमध्ये दाखल करण्यात आलेल्या बालकांपैकी ४१ टक्के बालकेच सर्वसाधारण श्रेणीत आले आहेत. तर ४ बालकांनी हे केंद्रच सोडल्याने पुन्हा त्याच श्रेणीत राहिल्याचे दिसून येत आहे. तर आॅक्टोबरअखेर जिल्ह्यात तीव्र कमी वजनाची १४२९ बालके असल्याचे आढळून आले.हिंगोली जिल्ह्यात कुपोषण निर्मूलनासाठी शासनाने ग्राम बाल विकास केंद्र स्थापनेसाठी निधी दिला होता. जवळपास ५0 लाखांपेक्षा जास्त निधी यावर खर्च झाला. यात तीव्र कुपोषित असलेली एकूण ४४४ बालके दाखल केली होती. कळमनुरी-२३, वसमत-१३४, हिंगोली-६१, सेनगाव-९१, औंढा ना.-१0९ तर आखाडा बाळापूर-२६ अशी प्रकल्पनिहाय बालकांची संख्या होती. यापैकी १८३ बालके तीव्रमधून कमी कुपोषित गटात आली होती. तर २१८ बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यात यश आले होते. यामध्ये कळमनुरी-६, वसमत-८१, हिंगोली-३६, सेनगाव-४६, औंढा नागनाथ-४४, आखाडा बाळापूर-५ अशी बालकांची संख्या आहे. यात सर्वाधिक ६0 टक्के बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यात वसमत प्रकल्पाला यश आले होते. तर बाळापूरचे सर्वांत कमी २0 टक्केच काम होते. कळमनुरीतील १ तर हिंगोलीची तीन बालके हे केंद्रच सोडून गेले. एनआरसीमध्ये ५ बालकांना दाखल केले होते. तर ३४ बालकांची कमी कुपोषणाच्या श्रेणीतून सुधारणा झाली नसल्याचेही अहवालात म्हटले आहे.आॅक्टोबर महिन्यात पुन्हा तपासणी केली असता जिल्ह्यात पुन्हा कमी व तीव्र कमी वजन गटातील बालकांच्या संख्यात वाढ झालीआहे. त्यामुळे एकीकडे कुपोषणावर मात केली की, दुसरीकडे पुन्हा तेवढीच नवीन मुले या गर्तेत ढकलली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.आॅक्टोबर महिन्यात केलेल्या सर्व्हेक्षणात जिल्ह्यातील ९७ हजार २८४ बालकांचा सर्व्हे केला. यातील ७८ हजार ९७६ बालकांचे वजन घेतले. यापैकी ७0 हजार ११५ बालके सर्वसाधारण आढळली. यामध्ये कळमनुरी ५५७८, वसमत-१६0५४, हिंगोली-१२५५८, सेनगाव-१३७२७, औंढा ना.-१३१४८, आखाडा बाळापूर-९0५0 अशी संख्या आहे. तर ७४३२ बालके कमी वजन गटातील आहेत. यात कळमनुरी-५९१, वसमत-१४0५, हिंगोली-१५१३, सेनगाव-१४६६, औंढा-१५७९ तर आखाडा बाळापूर-८७८ अशी संख्या आहे.तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्या मात्र वाढली आहे. यात कळमनुरी १२८, वसमत-२१३, हिंगोली-३४७, सेनगावगफ़६८, औंढा ना.-२९२, आखाडा बाळापूर-१८१ अशी प्रकल्पनिहाय संख्या आहे. हे प्रमाण १.८१ टक्के आहे.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदHealth Tipsहेल्थ टिप्स