शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
3
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
4
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
8
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
9
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
10
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
11
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
12
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
13
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
14
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
15
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
16
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
17
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
18
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
19
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
20
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती

३३ हजारांवर अर्ज धूळ खातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:51 IST

मागील पाच ते सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कर्जमाफीच्या प्रक्रियेला अजूनही अंतिम स्वरुप आले नाही. जवळपास ३३ हजार ३५ अर्जधारक शेतक-यांना कर्जमाफी मिळणार की नाही? हा प्रश्न कायम आहे. यापैकी २९ हजार ६८४ अर्ज तालुका समितीने दुरुस्ती करून शासनाच्या वेबसाईटवर अपलोड केले असून यातून ग्रीन लिस्टमध्ये आलेल्यांना कर्जमाफी मिळू शकते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील पाच ते सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कर्जमाफीच्या प्रक्रियेला अजूनही अंतिम स्वरुप आले नाही. जवळपास ३३ हजार ३५ अर्जधारक शेतक-यांना कर्जमाफी मिळणार की नाही? हा प्रश्न कायम आहे. यापैकी २९ हजार ६८४ अर्ज तालुका समितीने दुरुस्ती करून शासनाच्या वेबसाईटवर अपलोड केले असून यातून ग्रीन लिस्टमध्ये आलेल्यांना कर्जमाफी मिळू शकते.शासनाने कर्जमाफीसाठी पात्र ठरण्यात कोणतीही अडचण नसलेल्या ३३ हजार ९९३ शेतकºयांसाठी ११९.२८ कोटी रुपये बँकांकडे वर्ग केले आहेत. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ हजार ७७२ खातेदारांना २४.४७ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकेच्या ११ हजार ४५ जणांना ६२.२४ कोटी तर ग्रामीण बँकेच्या ६१७६ खातेदारांसाठी ३२.५५ कोटी रुपये वर्ग केले आहेत. मात्र यापैकी ३३ हजार ६0८ शेतकºयांच्या खात्यावर १0३.९८ कोटी प्रत्यक्ष जमा झाले आहेत.याशिवाय माहिती जुळत नसल्याने प्रलंबित असलेले ३३0३५ अर्ज आहेत. तर काहींचे अर्जच दुहेरी, तिहेरी असल्याने एकूण ३३ हजार ४६२ अर्ज तालुका समितीकडे निर्णयास्तव पाठविले होते. त्यात दुरुस्ती झाल्यानंतर समितीने २९ हजार ६८४ अर्ज शासनाच्या वेबसाईटवर अपलोडींगला पाठविले आहेत. यात हिंगोली-७९६७, वसमत-६९९६, औंढा ना.-२६९६, कळमनुरी-६५३२ तर सेनगाव- ५४९१ अशी तालुकानिहाय अर्जांची संख्या आहे. या अर्जांची राज्य समितीकडे तपासणी झाल्यानंतर निकषात किती बसतील, याचा काही नेम नाही. या अर्जांमधून निकषात बसलेल्या शेतकºयांची ग्रीन लिस्ट आल्यास संबंधितांना कर्जमाफीचा लाभ मिळणे शक्य आहे. तर हिंगोली-४४९, वसमत-९७0, औंढा ८१७, कळमनुरी-६६१ व सेनगाव ८८१ असे ३७७८ अर्ज बँकांच्या उदासीनतेमुळे तालुका समित्यांकडेच पडून आहेत. हे अर्ज अपलोड करण्याची मुदत संपूनही यात काहीच झालेले नाही.उदासीनता : दीड लाखांवरील कर्जज्यांच्याकडे दीड लाखांपेक्षा जास्त कर्ज होते अशांना उर्वरित रक्कम भरल्यानंतरच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. असे ३३८५ शेतकरी आहेत. यात जि.म.स.च्या ११७९ शेतकºयांना ९१ लाख तर राष्ट्रीयीकृत बँकांच्या २२0६ शेतकºयांना १४.३७ कोटींचा लाभ मिळू शकतो. मात्र उर्वरित रक्कम नभरल्याने कर्जमाफीचे १५.२९ कोटी रुपयेही तसेच पडून आहेत. ही उर्वरित रक्कम भरण्याकडे शेतकºयांचा फारसा कल नाही. त्यातच यंदा अल्पपर्जन्यामुळे खरीप तर अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रबीला फटका बसला. त्यामुळे याला प्रतिसाद मिळणे शक्य नाही.कर्जमाफीसाठी १ लाख ५ हजार शेतकºयांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३६९९३ पात्र ठरले. यातून ३३६0८ जणांना प्रत्यक्ष कर्जमाफी मिळाली. तर त्रुटी दूर करून अजून २९६८४ अर्ज शासनाकडे गेले आहेत.