शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

हिंगोलीत ‘सौभाग्य’साठी ३२ हजार वीज मीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 00:50 IST

प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून महावितरणच्या हिंगोली मंडळातील अद्याप घरांमध्ये वीज न पोहचलेल्या १८ हजार ९९८ कुटुंबांना वीज जोडणी देण्यात आली आहे. योजनेसाठी लागणारे ३२ हजार वीजमीटर महावितरणकडे उपलब्ध आहेत. जिल्हयातील ४७ हजार २३१ कुटुंबाना वीज जोडणी देण्याचे उदिष्ट महावितरणला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून महावितरणच्या हिंगोली मंडळातील अद्याप घरांमध्ये वीज न पोहचलेल्या १८ हजार ९९८ कुटुंबांना वीज जोडणी देण्यात आली आहे. योजनेसाठी लागणारे ३२ हजार वीजमीटर महावितरणकडे उपलब्ध आहेत. जिल्हयातील ४७ हजार २३१ कुटुंबाना वीज जोडणी देण्याचे उदिष्ट महावितरणला आहे.महावितरणने २०११ च्या जनगणनेनुसार जिल्हयातील अद्याप वीज नसलेल्या ४७ हजार २३१ कुटूंबांना सौभाग्य योजनेच्या माध्यमातून वीज जोडणीचे लक्ष निधार्रीत केले आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार तसेच औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्या निर्देशानुसार ‘सौभाग्य’च्या माध्यमातून राज्यातील वीज न पोहचलेल्या कुटूंबांना वीजेचे स्वप्न साकार करण्याच्या हेतूने सर्व वीज जोडणीकरीता जुलै २०१८ पासून मोहीमेस प्रारंभ केला आहे.जिल्ह्यातील ४७ हजार २३१ कुटूंबियांपैकी ४ हजार ३२५ कुटूंबियांकरीता नव्याने पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. यात रोहित्रासह विजेचे खांब, तारा कामांचा समावेश आहे. सदर कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या पंधरा दिवसांमध्ये सर्व यंत्रणा उभी करण्याचे आदेश संबंधीत एजन्सीधारकांना दिले आहेत. विजेपासून वंचीत असलेल्या २३ हजार ९०८ कुटूंबियांना सौभाग्यच्या माध्यमातून पंधरा दिवसाच्या आत वीजजोडणी देण्याचा निर्धार करण्यात आला आहे.योजनेतंर्गत (दारिर्द्य रेषेखालील कुटुंब) मोफत वीज जोडणीसोबतच नऊ वॅटचा एक एलइडी बल्ब आणि एक पिनपॉर्इंट फिटिंग विनाशुल्क करून देण्यात येणार आहे. तर वीजजोडणीपासून वंचित इतर नागरिकांना (दारिद्र्य रेषेवरील कुटुंब) यांना अवघ्या ५०० रुपयांमध्ये वीज जोडणी मिळणार आहे. हे शुल्कही नियमित वीज बिलासोबत दहा हप्त्यांत भरण्याची सुविधाही असल्याचे सांगण्यात आले.पंधरा दिवसांत कामे : उद्दीष्ट पूर्ततेचे नियोजनसौभाग्य योजनेतून प्रत्येक गरीबाच्या घरात वीजजोडणी मिळणार आहे. विजेवरील उपकरणांच्या वापरामुळे सर्व सामान्य कुटूंबांचे जीवन सुकर होवून रोजगारांच्या संधीत वाढ होणार आहे. योजनेची कामे जोरात सुरू असून कर्मचारी दररोज दोन हजार वीज जोडण्या पूर्ण करीत आहेत. उदिष्ट पुर्तता येत्या पंधरा दिवसांत पूर्ण केली जाईल, तसे नियोजन करण्यात आल्याचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी सांगितले. वीजजोडणी करीता आवश्यक वीज मीटरही उपलब्ध आहेत. सध्या योजनेसाठी हिंगोली मंडळाकडे ३२ हजार मीटर उपलब्ध असून येत्या दोन दिवसांत आणखी १० हजार मीटर उपलब्ध होणार असल्याचेही जाधव म्हणाले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीelectricityवीज