शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

‘मानव विकास’च्या ३८ फे-या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 00:33 IST

येथील एसटी महामंडळाच्या आगारात मानव विकासच्या एकूण २१ बसेस आहेत. हिंगोली, औंढा नागनाथ व सेनगाव या तीन तालुक्यात एकूण २७२ फेºया रोज होतात. मात्र आगाराच्या गलथान कारभारामुळे रोजच जवळपास ३० ते ५० फेºया रद्द होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे मात्र शाळकरी विद्यार्थिनी व प्रवाशांची हेळसांड होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील एसटी महामंडळाच्या आगारात मानव विकासच्या एकूण २१ बसेस आहेत. हिंगोली, औंढा नागनाथ व सेनगाव या तीन तालुक्यात एकूण २७२ फेºया रोज होतात. मात्र आगाराच्या गलथान कारभारामुळे रोजच जवळपास ३० ते ५० फेºया रद्द होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे मात्र शाळकरी विद्यार्थिनी व प्रवाशांची हेळसांड होत आहे.हिंगोली आगाराचे आगारप्रमुख या तीन दिवसांत एकदाही आगारात दिसून आले नाहीत, असे सांगितले जात आहे. तर आज ते मानव विकासच्या बैठकीमध्ये होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने मनमानी सुरु असल्याचे दिसून आले. गुरुवारी आगाराच्या दप्तराची पाहणी केली असता. मानव विकास बसच्या बुधवारच्या ३८ फेºया रद्द झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हा प्रकार रोजचाच आहे. शासन मानव विकासअंतर्गत विविध बाबींवर मोठा खर्च करते, मात्र येथील आगारप्रमुखांच्या उदासीनतेमुळे या विद्यार्थिनींना सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे.मानव विकास बस कधीच नियोजित वेळेत धावत नाहीत. त्यामुळे विद्यार्थिनींना शाळा-महाविद्यालयात पोहचण्यास नेहमीच विलंब होतो. याप्रकरणी एसटी महामंडळाकडे अनेक तक्रारी करुनही गेंड्याची कातडी परिधान केलेले प्रशासन दखल घेत नाहीत. उलट या तक्रारींना उत्तर न देताच केराची टोपली दाखविली जाते. वारंवार तक्रारी करुन विद्यार्थिनी त्रस्त झाल्या आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थिनींना अनेक अडचणींचा सामना करावा लात आहे. एकंदरीत आगारप्रमुखांच्या नियंत्रणाअभावी हिंगोली आगाराचा कारभार ढेपळाल्याचे दिसून आले. याकडे वरिष्ठांनी वेळीच लक्ष देऊन मनमानी कारभार थांबविण्याची मागणी प्रवासी व विद्यार्थिनींतून होत आहे.याप्रकरणी आगारप्रमुख प्रे.भी.चौथमल म्हणाले, बसेसच्या फेºया रद्द होण्याचे कारण संबंधित कर्मचाºयांना विचारल्याशिवाय सांगता येणार नाही. मानव विकास बसच्या फेºया उद्या माहिती घेऊन सांगतो, असे त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Schoolशाळाzpजिल्हा परिषद